जळगाव : गुरुवारी जाहीर झालेल्या बारावी परीेक्षेत मुलांपेक्षा सावित्रीच्या लेकींनी बाजी मारली आहे. दरवर्षाप्रमाणे यंदा देखील मुलीच हुशार ठरल्या आहे. जळगाव जिल्ह्यातून मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.९१ व मुलांचे प्रमाण ८७.४५ टक्के आहे. जिल्ह्यात २० हजार ११३ पैकी १८ हजार ४३६ मुली उत्तीर्ण झाल्या तर २९ हजार ४४३ पैकी २४ हजार ६५३ मुले उत्तीर्र्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ८९.७१ आहे.पुणे शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्राची परीक्षा फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात आली. परीक्षेचा निकाल आज दुपारी एकला आॅनलाइन जाहीर करण्यात आला. या निकालात नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यांचा समावेश आहे.नाशिक विभागातून सुमारे १ लाख ५७ हजार ३३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ३९ हजार ३४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.जिल्ह्यातून ४२ हजार विद्यार्थीजळगाव जिल्ह्यातील ४६ हजार ९६४ पैकी ४२ हजार १३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.जिल्ह्यातील ३२०८ विद्यार्थी मेरीटमध्येजिल्ह्यातील ३ हजार २०८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. यात सर्वाधिक विज्ञान शाखेच्या २ हजार १७२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.कला शाखेचे २३० विद्यार्थी देखील मेरीटमध्ये आले आहे. पहिल्या श्रेणीमध्ये १८ हजार ३१६ तर व्दितीय श्रेणीत १९ हजार ६३९ विद्यार्थी पास उत्तीर्ण झाले. पास श्रेणीत अवघे ९७४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.बारावी परीक्षेचा निकाल मिळताच विद्यार्थ्यांचा जल्लोषबारावीच्या परीक्षेत केसीई सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाने यंदा देखील आपले वर्चस्व राखले आहे. या महाविद्यालयाचा निकाल ९७.२४ टक्के लागला असून वाणिज्य शाखेचा आयुष दिनेश येवले हा विद्यार्थी ९६़६१ टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे़ तर वैष्णवी राहुल तोतले ९५़६९ टक्के मिळवून द्वितीय तर निकिता सोपान पाटील ९५़५३ टक्के मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत़ गुरूवारी निकाल जाहीर होणार असल्याचे कळताच परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसोबत पालकवगार्ची देखील धाकधूक वाढली होती. दुपारी एक वाजता निकाल आॅनलाइन जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांनी घरीच मोबाईल, लॅपटॉपवर आॅनलाईन निकाल पाहिला़ अनेक विद्यार्थी निकाल पाहिल्यानंतर आपला आनंदोत्सव साजरा केला तर काहींनी निकाल सांगण्याकरिता अनेकांनी आपल्या नातलगांना फोन करून निकालाची बातमी दिली. तर पाल्याला चांगले गुण मिळाल्याने पालकांनी सुध्दा त्यास पेढा भरवून आनंदोत्सव साजरा कला़विवेकानंद महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.अजिबात ताण न घेता केला नियमित अभ्यास आणि स्वत:च्या नोट्समुळे यश - आयुष४सातत्यपूर्ण अभ्यास, गुरूजनांचे मार्गदर्शन आणि स्वत:च काढलेल्या नोट्स यामुळे यश मिळाले असल्याचे जळगाव शहरात अव्वल आलेल्या आयुष येवले याने सांगितले. जळगाव शहरातील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (मु.जे.) चा विद्यार्थी असलेल्या आयुष याला बारावी वाणिज्य शाखेत ९६ टक्के गुण मिळाले आहेत. त्याला अकाऊंटमध्ये ९८, गणितात १०० आणि अर्थशास्त्रात ९९ गुण आहेत. त्याच्या या यशाबद्दल बोलताना आयुष म्हणाला की, अजिबात तणाव न घेता नियमितपणे अभ्यास केला. परिक्षेच्या काळात सात ते आठ तास आणि त्या आधी दररोज ४ तास अभ्यास केला. त्यामुळे हे यश मिळाले. वर्षभर अभ्यास केल्यावर शॉर्ट नोट्स बनवत असेल. परीक्षेच्या काळात त्याचा जास्त फायदा झाला. त्याशिवाय कॉलेज आणि क्लासेसमध्ये मार्गदर्शन मिळतच होते.’४तो पुढे म्हणाला की, परीक्षा झाल्यावर अपेक्षा होती की ९५ टक्केपेक्षा जास्त मार्कस् मिळतील. त्या अपेक्षेनुसार गुण मिळाले याचा आनंद आहे. भविष्यात सीए व्हायचे आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. सीए फांऊडेशनचे आॅनलाईन क्लासेस देखील सुरू आहेत.’
बारावी परीक्षेत सावित्रीच्या लेकींची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 12:26 PM