लोकमत न्यूज नेटवर्क
वरखेडी, ता.पाचोरा : जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध यात्रोत्सवापैकी एक असलेल्या सावखेडा बु. येथील भैरवनाथ यात्रोत्सव कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. प्रसिद्ध भैरवनाथ दरवर्षी पौष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक रविवारला साजरा होतो.
यावर्षी १४ जानेवारी पौष महिन्याला प्रारंभ होत असून, हा यात्रोत्सव रद्द करण्यात आलेला असून, कुणीही या ठिकाणी गर्दी करू नये, असे भैरवनाथ देवस्थान संस्थांचे अध्यक्ष भागचंद फुलचंद परदेशी यांनी आवाहन केले असून तशा आशयाचा येथे सूचना फलक लावण्यात आला आहे.
यासंदर्भात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक नीता कायटे यांनी नुकतीच संचालक मंडळाची बैठक घेऊन सूचना केल्या. या बैठकीवेळी संस्था अध्यक्ष भागचंद फुलचंद परदेशी, गोकुलसिंग परदेशी, प्रकाश परदेशी, प्रकाश मोची, सुनील परदेशी, बंडू तडवी, एकनाथ पाटील, धोंडू गायकवाड, सुकलाल परदेशी व ग्रामस्थ हजर होते.
यात्रा उत्सव काळात हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. यावेळी अनेक व्यावसायिक या ठिकाणी आपले व्यवसाय थाटत असतात. परंतु यावर्षी कोरोना महामारीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून यात्रोत्सव रद्द करण्यात आलेला आहे.