शासनाच्यावतीने सुरू केलेल्या महिला लोकशाही दिनात हा उपक्रम झाला तेव्हापासून अर्ज सादर करीत असून सातत्याने आमच्या तक्रार असलेल्या सहकारी संस्थांमधून ठेवीच्या रकमा संपूर्ण व्याजासह परत मिळण्यासाठी महिला लोकशाही दिनाच्या दिवशी आम्ही लाक्षणिक उपोषण सुद्धा केले. परंतु न्याय मिळत नसून तक्रार असलेल्या सहकारी संस्थांची मोठ्या प्रमाणावर वसुली होऊन सुद्धा सहकार खात्याचे अधिकारी या विषयाकडे दुर्लक्ष करीत आहे. पतसंस्थांविरूद्ध प्रभावी उपाय योजना करीत नसल्यानेच पतसंस्थाचालक व सहकार अधिकारी शासनाच्या उपक्रमाची खिल्ली उडवित असल्यानेच महिलांना वारंवार अर्ज घेऊन पाठपुरावा करावा लागत आहे. एक प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखविण्याचाच हा प्रकार आहे. राज्य महिला आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या तक्रारदार महिलांना अद्यापपर्यंत तक्रार असलेल्या पतसंस्थांमधून ठेवीच्या रकमा परत मिळाल्या नसून तक्रार असलेल्या पतसंस्थांविरूद्ध एम.पी.आय.डी तसेच ईडीकडे सदर संस्थांचा प्रस्ताव पाठविण्यात यावा तसेच संबंधित संस्थाचालांकाची संस्था स्थापन झाल्यापासूनच्या मालमत्ता जप्त करण्याच्या संदर्भात कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या आहेत. जिल्हा महिला लोकशाही दिनात वारंवार तक्रारदार महिलांना तक्रार असलेल्या सहकारी पतसंस्थांमधून ठेवीच्या रकमा संपूर्ण व्याजासह परत करण्याच्या संदर्भात कालमर्यादीत आदेश सहकार विभागाला देऊन पुढील महिला लोकशाही दिनापर्यंत वारंवार महिला ठेवीदारांना ठेवीच्या रकमा मिळण्याच्या अपेक्षा आहे.- संध्या एस.चित्ते, ठेवीदार.
अधिकाऱ्यांकडून उपक्रमाची खिल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:07 PM