आॅनलाईन लोकमतधुळे, दि.३० : शिक्षणाचा खर्च प्रचंड वाढलेला आहे. केवळ पैसे नाही म्हणून शिक्षण थांबता कामा नाही यासाठी कामगार कल्याण मंडळातर्फे कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. गेल्या तीन वर्षात धुळे जिल्ह्यातील अडीच हजार विद्यार्थ्यांना तब्बल ५८ लाख १० हजार रूपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीचा विद्यार्थ्यांना चांगलाच ‘आधार’ मिळालेला आहे.या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी कामगाराने कामगार कल्याण मंडळाचे सभासद असणे गरजेचे आहे. कामगारासाठी वार्षिक सभासद फी १५ रूपये तर कुटुंबियांसाठी २० रूपये असते. धुळ्यात जवळपास ३५०० सभासद आहेत.कामगार कल्याण मंडळातर्फे दहावी ते पदव्युत्तरपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येत असते.धुळे , शिरपूर , दोंडाईचा या कार्यालया मार्फत कामगार कुटुंबियाच्या विद्यार्थ्यांना सन २०१५ ते २०१७ या तीन वर्षात २५०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यांना तब्बल ५८ लाख १० हजार रूपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. सर्वसाधारण शिष्यवृत्तीसाठी नववीपासून किमान ६० टक्के गुण आवश्यक आहे. तर अपंगांसाठी टक्केवारीची अट ठेवण्यात आलेली नाही.याशिवाय पाठ्यपुस्तक घेण्यासाठीही या मंडळातर्फे सहाय्य मिळत असते. ११ वीपासून पुढे क्रमिक पुस्तकांच्या ५० टक्के रक्कम मिळत असते. तर एटीकेटी विद्यार्थी पात्र व विद्यार्थ्यांना १०० टक्के रक्कम मिळत असते. पाठ्यपुस्तक सहाय्य योजनेत २३० विद्यार्थ्यांना २ लाख २८ हजार रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात आलेले आहेत.एमएससीआयटीसाठीही कामगार कल्याण मंडळ कामगारांच्या पाल्यांना मदत करीत असते. यात फीची ५० टक्के रक्कम मिळत असते. एमएससीआटी योजनेत २०० विद्यार्थ्यांना तीन वर्षात ३ लाख ५३ हजार रूपयांची रक्कम वाटप करण्यात आले आहेत. तर गंभीर आजार असलेल्या कामगारांनाही २५ हजार रूपयांपर्यंत मदत मिळत असते.ांभीर आजार सहाय्य योजनेत ५५ अर्जदारांना १० लाखांची मदत करण्यात आल्याची माहिती चितोड केंद्राचे संचालक भरत वाघारे व देवपूर केंद्राचे संचालक दिलीप शिंपी यांनी दिलेली आहे.
धुळ्यात कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 5:56 PM
धुळे जिल्ह्यात तीन वर्षात अडीच हजार विद्यार्थ्यांना मिळाली ५८ लाखांची शिष्यवृत्ती
ठळक मुद्देशिष्यवृत्तीसाठी नववीपासून किमान ६० टक्के गुण आवश्यकअपंगांसाठी टक्केवारीची अट ठेवण्यात आलेली नाहीपाठ्यपुस्तक सहाय्य योजनेत २३० विद्यार्थ्यांना २ लाख २८ हजार रूपयांचे अर्थसहाय्य