निपाणे, ता.एरंडोल : जवखेडेसिम येथील जिल्हा परिषद शाळा इमारत ही जवळपास १० वषार्पासून जीर्ण अवस्थेत उभी आहे. यामुळे विद्यार्थ्यांना धोका पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याची दखल घेत ही इमारत लवकारात लवकर पाडावी , अशी मागणी पालकांकडून होत आहे.या जीर्ण इमारतीच्या आजुबाजुला अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व षटकोणी मराठी शाळेचे वर्ग आहेत. जिल्हा परिषद मराठी शाळेची ही पुर्ण धोकादायक झाल्याने ती पाडण्यात यावी म्हणून सन २०१६ मध्ये लेखी स्वरूपात पाठपुरावा करण्यात आला होता. त्यावेळी एरंडोल तालुक्यात असलेल्या १३ जिर्ण इमारतींपैकी इतर गावांमधील जीर्ण इमारत पाडण्यात आल्या परंतु जवखेडेसिम येथील इमारत त्याच अवस्थेत उभी आहे.सरपंच दिनेश आमले यांनी देखील ही जीर्ण शाळा इमारत पाडण्यासाठी पाठपुरावा केला तरी जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे बघ्याची भुमिका घेतली आहे. पाचोरा तालुक्यातील भोरटेक या गावातील जीर्ण शाळेमुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता मात्र जवखेडेसिम मराठी शाळेची इमारतही तशीच झाली असताना दुर्लष होत असल्याने एखादा अपघात झाला तर याला जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहील असे सरपंच दिनेश आमले यांनी सांगितले.या शाळेच्या इमारती जवळ अंगणवाडीचे व इतर लहान तसेच तरुण बसलेले असतात. ही इमारत ढासळल्यास मोठा अपघात होवू शकतो.जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ इमारत पाडण्याची कार्यवाही करावी व धोका टाळावा, अशी मागणी सरपंच दिनेश आमले व गावातील नागरिकांनी केली आहे.
शाळेची इमारत बनली धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 7:26 PM