सागर दुबेजळगाव - शिक्षणाच्या माध्यमातून चांगले समाज घडविण्याचे कार्य शिक्षणाचे असते़ त्यामध्ये मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी गुरूजींची महत्वाची भुमिका असते़ अलीकडे मात्र जिल्हा परिषद शिक्षण शिक्षणाचा बट्टयाबोळ झाला आहे़ गुरूजी शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांची वाट बघत असता हे ऐकले होते मात्र, काही दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या अचानक भेटीनंतर विद्यार्थीच गुरूजींची वाट बघत शाळाबाहेर उभे असल्याचा प्रकार समोर आला होता़ त्यामुळे गोरगरिब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्टयाबोळ झाला आहे़ग्रामीण भागातील सर्वाधिक विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत़ मात्र, गेल्या काही काळापासून जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्यामध्ये घट होत आहे़ दुसरीकडे इंग्रजी शाळांची वाढत्या संख्यांमुळे जि़प़शाळांमधील विद्यार्थी त्या शाळांकडे वळू लागली आहे़ यातच जर शिक्षक शाळांमध्ये उशिरा येत असतील तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो़ काही दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी दिल्यानंतर शिक्षकच शाळेत येत नसल्याचा प्रकार समोर आणला होता़ हा प्रकार समोर येताच शिक्षण विभागाचे बिंग फुटले होते़ शिक्षण विभागाला खाडकण जाग येऊन लागलीच झोपलेल्या विस्तार अधिकाºयांना तसेच केंद्र प्रमुखांना कामाला लावले़ विस्तार अधिकाºयांनी पंधरा दिवसातून शाळांना एकदा तरी भेट देणे महत्वाचे आहे़ तर केंद्र प्रमुखांनी सुध्दा आठवड्यातून एकदा शाळांना भेटी देणे बंधनकारक आहे़ पण़़ जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील शाळांना अचानक भेट दिल्यानंतर सर्वत्र अनागोंदी कारभार आढळून आला़ एका शाळेत तर सातवीच्या विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकावर लिहिलेले उत्तर सुध्दा वाचता येत नव्हते़ हा तर गंभीरच प्रकार समोर आला़ यावरून विद्यार्थ्यांना चांगले शिक्ष ण मिळते आहे की नाही? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे़ विशेष म्हणजे ़़़ शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद शाळा डिजीटल करण्याचे काम सुरू आहे़ १८०० च्यावर प्राथमिक जि़प़शाळा आहेत़ त्यापैकी पंधराशेच्यावर शाळा डिजीटल आहेत़ परंतू, हजाराच्यावर शाळांमध्ये वीजच नसल्यामुळे शाळा फक्त नावालाच डिजीटल असल्याचा प्रकार सध्या जिल्ह्यात सुरू आहे़ विस्तार अधिकाºयांन दिवसाला तीन शाळांना भेटी देण्याचे आदेश नुकतेच देण्यात आले आहे़ मात्र, या आदेशाचे कितपत पालन होते याच्यावर सर्वांचे लक्ष लागून असून जिल्हा परिषद शिक्षणात सुधारणा होईल का? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे़