चाळीसगाव : ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक राठोड हे प्राथमिक इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी गच्चीवरची शाळा या नावाने कौतुकास्पद उपक्रम राबवित आहे.कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे नववी इयत्तेच्या पुढील वर्ग काही काळानंतर सुरू झाले. परंतु पहिली ते आठवीचे वर्ग अद्यापही बंद आहे व लवकर सुरू होतील, असे दिसूनही येत नाही. यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झालेले आहे. अशीच परिस्थिती चाळीसगाव तालुक्यातील ओढरे येथेही पहावयास मिळत आहे. येथील अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होऊन शेतीच्या कामात किंवा अन्य कार्यात आपल्या पालकांना हातभार लावित आहे. त्यामुळे अतोनात शैक्षणिक नुकसान झालेली ही बाब प्रकर्षाने अशोक राठोड यांच्या लक्षात आल्यावर ते गच्चीवर शाळा भरवून अध्यापनाचे धडे देत आहेत. राठोड यांच्या या सत्कृत्यामुळे जे पालक आर्थिकदृष्ट्या असक्षम असल्याकारणाने स्मार्ट मोबाईल पाल्यांना उपलब्ध करुन दिले नाही अशी मुले शिक्षणाचे धडे गिरवित आहे. अशोक राठोड या अध्यापन वर्गाद्वारे गणिताच्या मूलभूत क्रिया, पाढे पाठांतर तसेच मराठी व इंग्रजी वाचन, लेखन क्रियांचा शैक्षणिक विकास घडवून आणत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, राठोड यांच्या या सेवाभावीवृत्तीचे कौतक करीत आहे. यासाठी राकेश गवळी यांचे सहकार्य लाभत आहे.
ओढरेत भरतेय गच्चीवर शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 2:43 PM
ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक राठोड हे प्राथमिक इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी गच्चीवरची शाळा या नावाने उपक्रम राबवित आहे.
ठळक मुद्देवंचित विद्यार्थ्यांसाठी सुविधाबंजारा फाऊंडेशनचा उपक्रम