गोंडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत असरचा अहवाल प्रकाशित होत असतो. त्या अहवालानुसार किती विद्यार्थ्यांना बेरीज वजाबाकी येते लिहता वाचता येते का, हे तपासले जात असते त्याच धर्तीवर आधारित महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या निर्देशानुसार शैक्षणिक सत्र २०१८-१९ साठी राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी आपले मूल्यांकन व प्रमाणीकरण करणे तसेच शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे आवश्यक आहे.त्या अनुषंगाने देशभरात शाळासिद्धी तर महाराष्ट्रात समृद्ध शाळा नावाने शाळांना स्वयंमूल्यमापन करणे अनिर्वाय आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये शाळासिद्धी स्वयंमूल्यमापनाच्या सिद्धतेसाठी सर्वत्र शाळा धडपड करताना दिसत आहेत. परंतु याविषयी शाळासिद्धीची माहिती भरत असताना केवळ कागदीघोडे नाचवत असल्याचेही दिसून आले.असे आहे स्वयंमूल्यमापन - शाळेतील उपलब्ध साधन त्याची उपयुक्तता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते पर्याप्त आहे का, याची पडताळणी करून त्यानुसार गुण द्यावे लागतात.उदाहरणार्थ शाळांमधील ग्रंथालयात आवश्यक पुस्तकांची संख्या विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होतो का ? तसेच संगणक , शिक्षकांची संख्या शिक्षकांच्या शिकविण्याची पद्धती आदींबाबतदेखील मूल्यमापन करून गुण द्यावे लागतात.अशी आहे कार्यपद्धती -१. शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती२. शाळेतील संपूर्ण शिक्षकांची माहिती३. ७ परिक्षेत्र म्हणजे ४६ गाभा माणके४. प्रत्येक मानकानुसार त्या- त्या स्तरांमध्ये सुधारणेचे नियोजन३० जानेवारीपर्यंत मुदत- शाळासिद्धी उपक्रमांतर्गत शाळांना आपल्या शाळेतील स्वयंमूल्यमापनासाठी ३० जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आह.े जिल्ह्यातील शाळांना स्वयंमूल्यमापनासाठी केवळ ४ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.श्रेणी गुणअ - ११२ ते १३८ब - ६९ ते १११क - ६८ किंवा त्यापेक्षा कमी गुणकोरा कागद निळी शाई - महाराष्ट्र शासन शिक्षणावर अफाट असा खर्च करीत आहे परंतु विद्यार्थ्यांची पाटी मात्र कोरीच दिसून येत आह,े असे का? याचा विचार होणे गरजेचे आहे. काही शाळांमध्ये तर नुसतीच आकडेमोड होत आहे. कोरा कागद काळा होत आहे म्हणजेच नावालाच सिद्धता करीत आहेत. विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण दिले जात नाही. फक्त आणि फक्त कोरा कागद निळी शाई बोल बाबा दगड का माती म्हणण्याची वेळ पालकांवर आली असल्याचे मात्र सिद्ध होते.प्रत्येक शाळेने मुदतीत माहिती सादर करायची . ७ क्षेत्र व ४६ गाभा मानकानुसार माहिती व्यवस्थित भरून जमा करावी. खोटी वा कागदीघोडे नाचविणारी माहिती असेल तर त्याची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी केली जाईल. तसेच संबधित शाळेवर कारवाई केली जाईल.-देवीदास महाजन, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जळगाव
शाळासिद्धी अंतर्गत स्वयंमूल्यमापनाच्या सिद्धतेसाठी शाळांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 4:24 PM
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत असरचा अहवाल प्रकाशित होत असतो. त्या अहवालानुसार किती विद्यार्थ्यांना बेरीज वजाबाकी येते लिहता वाचता येते का, हे तपासले जात असते त्याच धर्तीवर आधारित महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या निर्देशानुसार शैक्षणिक सत्र २०१८-१९ साठी राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी आपले मूल्यांकन व प्रमाणीकरण करणे तसेच शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे आवश्यक आहे.त्या अनुषंगाने देशभरात शाळासिद्धी तर महाराष्ट्रात समृद्ध शाळा नावाने शाळांना स्वयंमूल्यमापन करणे अनिर्वाय आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये शाळासिद्धी स्वयंमूल्यमापनाच्या सिद्धतेसाठी सर्वत्र शाळा धडपड करताना दिसत आहेत.
ठळक मुद्देप्रश्न विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचाविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा प्रश्न