शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

शालेय विद्यार्थ्यांना दूधासाठी अजून महिनाभर वाट पहावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 10:04 PM

जिल्'ातील जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना १ नोव्हेंबर पासून दूध वितरीत केले जाणार असल्याची घोषणा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली होती. मात्र जिल्हा दूध संघाकडून ‘एनडीडीबी’कडेशाळांचे प्रस्ताव पाठविण्यास उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना दूधासाठी अजून महिनाभर वाट पहावी लागणार आहे.

ठळक मुद्दे जिल्हा दूध संघाकडून प्रस्ताव पाठविण्यास विलंब १ नोव्हेंबरपासून जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार होते दूध१० हजार विद्यार्थ्यांना मिळणार दूध

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.६-जिल्'ातील जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना १ नोव्हेंबर पासून दूध वितरीत केले जाणार असल्याची घोषणा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली होती. मात्र जिल्हा दूध संघाकडून ‘एनडीडीबी’कडेशाळांचे प्रस्ताव पाठविण्यास उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना दूधासाठी अजून महिनाभर वाट पहावी लागणार आहे.

गुजरात येथील आनंद  शहरातील ‘आनंद दूध डेअरी’ला नुकतेच ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्तडेअरीकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी 'स्वीट  मिल्क' हा  उपक्रम राबविला  जात आहे.  या उपक्रमातंर्गत  शासकीय  शाळांच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी २०० मीली दूध देण्यात येणार होते. तशी माहिती आनंद डेअरीकडून जिल्हा दूध संघ व जि.प.शिक्षण विभागाला देण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेकडून दूध संघाने या उपक्रमाबाबत मंजुरीचे पत्र देखील प्राप्त केले होते.

जि.प.कडून मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हा दूध संघाला एन.डी.डी.बी.कडे शाळांचा प्रस्ताव पाठवायचा होता. प्रस्ताव पाठविल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत विद्यार्थ्यांना दूध वितरीत होणार होते. याबाबतमाजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी १ नोव्हेंबरपासून दूध  वितरीतहोणार असल्याचे शिक्षकपुरस्कारवितरणसोहळ्याप्रसंगीजाहीर केले होते. मात्र दूध संघाने हा प्रस्ताव पाठविण्यास उशीर केल्याने १ नोव्हेंबर रोजी दूध वितरणाचा मुहूर्त हुकला आहे. आता विद्यार्थ्यांना दूधा साठी अजून महिनाभर तरी वाट पहावी लागणार आहे. १० हजार विद्यार्थ्यांना मिळणार दूधया उपक्रमातंर्गत जि.प.शाळेतील १० हजार विद्यार्थ्यांना दूध वितरीत केले जाणार आहे. शाळांची निवड आनंद डेअरीच्या अधिकाºयांकडून केली जाणार आहे.  जिल्'ातील ज्या शाळांपर्यंत वाहतूक सोईस्कर होवू शकते अशा गावांमधील शाळांची निवड या उपक्रमासाठी करण्यात  येणार आहे. सुरुवातीला जिल्'ातील  १० हजार विद्यार्थ्यांना हे दूध वाटप केले जाईल. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने  जिल्'ातील विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे.

  कोट...जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना दूध वितरीत केले जाणार होते. याबाबत १ नोव्हेंबरची तारीख ठरली होती. मात्र जिल्हा दूध संघाकडून प्रस्ताव पाठविण्यास थोडा उशीर झाला आहे. मात्र आता प्रस्ताव पाठविला असून लवकरच विद्यार्थ्यांना दूध वितरीत केले जाणार आहे.-मनोज लिमये, व्यवस्थापकीय संचालक,जिल्हादूधसंघ

आनंद डेअरीला ७५ वर्ष पूर्ण होणार असल्याने जिल्हा दूध संघाच्या माध्यामातून शाळांमध्ये  दूध वितरीत होणार आहे. जि.प.शिक्षण विभागाने आपला प्रस्ताव दूध संघाकडे पाठविला आहे. सध्या दूध वितरणाची काय स्थिती आहे, याबाबत दूध संघाच्या अधिकाºयांशी चर्चा करून माहिती घ्यावी लागणार आहे.-पोपटराव भोळे, शिक्षणसमिती,सभापती,जि.प.