लोकमत ऑनलाईन पाचोरा, जि.जळगाव, दि. 27 : म्हशी चारण्यासाठी गेलेल्या गौरव प्रवीण चौधरी या 13 वर्षीय विद्याथ्र्याचा बंधा:याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात शुक्रवारी दुपारी घडली. हातमजुरी करणा:या वडिलांना हातभार लागावा, यासाठी गौरव हा म्हशी चारण्यासाठी गेला होता. या डोहात म्हशी शिरल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी गौरव पाण्यात उतरला. मात्र पाण्यात चिखल असल्याने म्हशी बाहेर काढण्यात अपयश आले व तो चिखलात अडकून जागीच मरण पावला. ही घटना काही महिलांनी पाहिली. तेव्हा मधुकर चौधरी व छोटू गोविद चौधरी, नितीन ईश्वर चौधरी, नगरसेवक दादाभाऊ चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली व शोध घेतला. गौरवला बाहेर काढून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गौरव हा तावरे माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत होता. त्याचा पश्चात आई-वडील, भाऊ, काका, काकू, आजोबा असा परिवार आहे. गौरव हा शिवसेनेचे नगरसेवक धर्मेद्र चौधरी यांचा पुतण्या आहे.
पाचोरा येथे विद्याथ्र्याचा बंधा:याच्या पाण्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 1:23 AM
डोहातील म्हशींसाठी धडपड जीवावर बेतली
ठळक मुद्देम्हशी चारताना घडली घटनाभर दुपारी घडलेल्या घटनेमुळे हळहळबाहेरपुरा भागात व शाळेत शोक व्यक्त