मानव सेवा विद्यालयात विज्ञान दिनानिमित्त डॉ.सी.व्ही.रमन यांच्या प्रतिमेचे माध्यामिकच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शिशुच्या मुख्याध्यापिका मुक्ता पाटील व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते. यावेळी विद्यार्थांना विज्ञानाचे महत्व सांगण्यात आले.
जय दुर्गा विद्यालय
जय दुर्गा भवानी क्रीडा मंडळ संचलित जय दुर्गा माध्यामिक विद्यालयात संस्थेचे उपाध्यक्ष अनिल पाटील यांच्याहस्ते डॉ. सी. व्ही. रमन यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विज्ञान शिक्षिका सविता पाटील, प्राथमिकचे मुख्याध्यापक सागर कोल्हे यासह इतर शिक्षक उपस्थित होते.
राज विद्यालय
राज प्राथमिक विद्यालयात व डॉ. सुनिल महाजन महाविद्यालयात उपशिक्षिका जयश्री महाजन यांच्याहस्ते डॉ. डॉ. सी. व्ही. रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्ही. बी. चौधरी, व्ही. डी. नेहते, एन. डी. महाजन, के. डी. ब-हाटे आदी कर्मचारी उपस्थित होते.
महात्मा गांधी विद्यालय
भादली येथील महात्मा गांधी विद्यालयात विज्ञान शिक्षक डी. के. धनगर, के. डी. रडे व पी. आर. भोळे यांनी डॉ. सी. व्ही. रमन यांचया जीवन कार्याबद्दल माहिती दिली. यावेळी संस्थेचे चेअरमन जी. एम. महाजन, मधुकर नारखेडे, सचिव सुनिल नारखेडे, मुख्याध्यापक आर. के. तायडे तसेच इतर शिक्षक उपस्थित होते.
पद्मालया इंग्लिश मिडीयम स्कूल
शिरसोली येथील पद्मालया इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन व विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्या स्वाती चौधरी, संगिता बारी, हेमंत नेमाडे, मनिष पाटील, आशिष तेलगोटे, स्वाती बारी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.