भुसावळ, जि.जळगाव : येथील पालिका संचलित म्युनिसिपल हायस्कूलमध्ये शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन पालिकेचे शिक्षण सभापती अॅड.बोधराज चौधरी यांनी केले.याप्रसंगी मुख्याध्यापक बी.वाय.सोनवणे व पर्यवेक्षक के.एम.चौधरी, ज्येष्ठ शिक्षक एस.के.जाधव, प्रदीप साखरे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक उपस्थित होते.यात विद्यार्थ्यांनी विविध ३० प्रयोग सादर केले. यात हेवी हायड्रोलिक ड्रील -राजकुमार चित्तोडिया, अलार्म-राधिका ठाकरे, ए सी. वीजपुरवठा शोधक-हर्षल धनगर, रेन वॉटर -रोहित आमोदकर, सेल्फ वॉटर प्लँट-शीतल चौधरी, मोशन सेंसर- दुर्गा बंड, प्रकाश संश्लेषण क्रिया -रिना किराडे, वाहत्या पाण्यापासून विद्युत निर्मिती-रुपाली राऊत, सूर्यग्रहण व चंद्रग्रहण- आदेश कुटे, मानवी पचन संस्था- नंदिनी कांडेलकर, विमान-भावेश पवार, विद्युत चुंबकीय मोटार- विकास तायडे, तांब्याची हकालपट्टी-शेख अमन तांबोळी, दोन आरशात मिळणारी प्रतिमा -आरती जोगे, बबल मशिन-ताहिर खाटिक, सामाजिक आरोग्य-सुंदरा काटेंगे, वाहत्या पाण्यापासून विद्युत ऊर्जा- भाविका चाकर , गतिरोधापासून मिळणारी ऊर्जा- माधुरी बोयत, विद्युत चुंबकीय मोटार- कल्याणी पाटील, यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर, रितीका बघेल, घन व द्र्रवपदार्थ वेगळे करणारे यंत्र- धनंजय सारवान, द्रवाचा दाब व पातळी व फवारा यंत्र-अर्जुनसिंग चित्तोडिया, गवत कापणी यंत्र- करण चित्तोडिया, जलशुद्धीकरण-सागर साळुंंखे, पवन चक्की- गाडेकर, लढाऊ विमान- मानसी अवसरमल, बोंडअळीपासून संरक्षण -नम्रता पाटील, प्रकाशाचे रेषिय संक्रमण -तेजस शारला.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपकरणांची उपस्थितांनी पाहणी केली व माहिती जाणून घेतली. सूत्रसंचालन सीमा भारंबे यांनी, तर आभार प्रदर्शन के.एम.चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी आर.पी.सोनवणे, व्ही.संध्या धांडे, प्रगती मेने, सरला सावकारे, शालिनी बनसोडे, अलका पाटील, एस.जी.मेढे, एन.पी. शिरोळे, एन.बी.वाढे, एन.एच.राठोड, एम.एच.किरंगे, प्रयोगशाळा साह्यक - लक्ष्मण पवार,. प्रदीप साखरे, शिक्षक व शिक्षकेतरांंनी परिश्रम घेतले. परीक्षक म्हणून द.शि. विद्यालयाचे एस. बी. पाटील, सी. एल मनुरे यांनी काम पाहिले.