सागर दुबे/ आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२५ : विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरात सायन्स पार्क (विज्ञान केंद्र) साकारण्यात येणार आहे़ यासाठीच्या हालचाली विद्यापीठ प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत़ दरम्यान, एक ते दीड वर्षाचा कालावधी या सायन्स पार्कच्या उभारणीसाठी लागणार आहे़ त्यानंतर हे विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी मिळणार असल्याची माहिती प्र-कुलगुरू पी़पी़ माहुलीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़विज्ञानाकडे विद्यार्थ्यांचे आकर्षण वाढावे तसेच विज्ञानाचे महत्त्व लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने माहिती व्हावे, यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सायन्स पार्क (विज्ञान केंद्र) च्या धर्तीवर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिसरात हे सायन्स पार्क साकारण्यात येईल़ यात विज्ञानात केले गेलेल्या विविध संशोधनांची माहिती पार्कमध्ये डिजिटल प्रकारातून दिली जाणार आहे. दरम्यान, किती एकरात हे सायन्स पार्क उभारण्यात येणार आहे हे अजून निश्चित झालेले नाही़ मात्र, नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात या सायन्स पार्कसाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़काय असेल पार्कमध्ये ?सायन्स पार्कमध्ये प्रत्येक विषयातील आतापर्यंत झालेल्या विविध शोधांची माहिती, तसेच सायन्स थीम आधारित माहितीच्या सादरीकरणासाठी थिएटर तयार केले जाईल़ तसेच सायन्स शो, व्याख्यान, मार्गदर्शन कार्यक्रम, प्रदर्शन आयोजित केले जातील़ या माध्यमातून अधिकाअधिक विज्ञानाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाईल. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेले उपकरण यात ठेवले जाणार आहे़ तर काही संशोधन हे पार्कमध्येच केले जातील़विद्यार्थ्यांसह पर्यटकांना बघण्याची संधीएक ते दीड वर्षानंतर उभारणी झाल्यानंतर हे सायन्स पार्क पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह पर्यटकांसाठी उपलब्ध होईल़ तसेच विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या पार्कला भेटी देता येणार आहे़ तर संशोधक, विद्यार्थी, तरुण, प्राध्यापक तसेच नागरिकांना त्यांच्या संशोधनांना यातून दाद मिळणार आहे़
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात साकारणार ‘सायन्स पार्क’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 3:51 PM
विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरात सायन्स पार्क (विज्ञान केंद्र) साकारण्यात येणार आहे़
ठळक मुद्देअर्थसंकल्पात या सायन्स पार्कसाठी २५ लाख रुपयांची तरतूदसायन्स शो, व्याख्यान, मार्गदर्शन कार्यक्रम, प्रदर्शनाचे होणार आयोजनविद्यार्थ्यांसह पर्यटकांना बघण्याची संधी