जामनेर, जि.जळगाव : येथील इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान कार्यशाळा उत्साहात पार पडली. यात प्रमुख मार्गदर्शक विज्ञान शास्त्रज्ञ शेख जहांगीर यांनी विद्यार्थ्यांसमोर विविध प्रकारचे विज्ञान प्रकल्प प्रदर्शन सादर केले.खराब झालेले स्पेअर पार्ट, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खराब झालेले स्पीकर, खराब टूथ ब्रश, प्लॅस्टिक बाटल्या, विविध टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू अशा विविध वस्तूंचे संशोधन करून चांगली वस्तू तयार करावी. आपण त्यांचा उपयोग दैनंदिन जीवनात कसा वापर करू शकतो अशा प्रकारचे विज्ञान प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखविले.या विज्ञान प्रदर्शनामध्ये इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्गातील विज्ञान शाखचेया विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग घेतला.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.समीर घोडेस्वार यांनी केले.या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक पी. आर. वाघ, उपप्राचार्य प्रा. जे. पी. पाटील, विज्ञान शाखाप्रमुख पर्यवेक्षक प्रा.के.एन.मराठे, कला शाखाप्रमुख पर्यवेक्षक प्रा. आर. ए. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तर प्रा. माधुरी महाजन, प्रा. के.डी.निमगडे, प्रा.एस.एम.क्षीरसागर, प्रा.सविता महाजन, प्रा.सोनूसिंग पाटील, प्रा.सचिन गडाख, प्रा.हर्षाली कोळी याचे सहकार्य लाभले.
जामनेर येथे विज्ञान कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 6:28 PM