शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
2
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
3
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
4
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
7
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
8
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
9
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी
10
सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!
11
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
12
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
13
BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...
14
पत्नीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात पतीने घरच पेटवलं; व्हिडीओ व्हायरल
15
४० हजार कोटींची संपत्ती असणाऱ्या तरुणाने घेतला सन्यास! ऐशोआरामाच्या जीवनाचा का केला त्याग?
16
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
17
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
18
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
19
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
20
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर

जप्त वाळूचे ट्रॅक्टर ‘गायब’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 3:56 PM

धरणगाव : तहसीलमधून वाहने पळविणे सुरुच

धरणगाव : येथील तहसील कार्यालय आवारातून अवैध वाहतूक करणारे डंपर व ट्रॅक्टर पळविण्याचे प्रकार सुरुच आहेत. पुन्हा एक ट्रॅक्टर २४ रोजी अज्ञातांनी लांबविल्याने धरणगाव पोलिसात महसूल प्रशासनाने २७ रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे.अवैध वाळू व गौण खनिज वाहतुकीचा केलेला लाखावर दंड बुडविण्यासाठी व चोरीचा गुन्हा दाखल होवून तपास सुरुच राहत असल्याने आरोपींकडून वाहने पळविण्या हा फंडा सर्रासपणे वापरला जात आहे. मात्र यामुळे दंड तर सुटणारच नाही वरुन चोरीच्या गुन्ह्यात सापडल्यानंतर आरोपी पुन्हा गुन्ह्यात अडकत असल्याचे महसूल प्रशासनाचे म्हणणे आहे.यासंदर्भात तलाठी अनिल प्रभाकर सुरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महसूल प्रशासनाने दि.२४ जानेवारी २०१९ रोजी रमेश मधुकर तायडे (रा.बांभोरी प्र.चा.) यांच्या मालकीचे अवैध वाळू वाहतूक करणारे टॅÑक्टर क्र.एमएच-१९ सी ३२३० हे जप्त करुन मालकास तहसीलदार यांनी दंड ठोठावला होता. मात्र दंडाची रक्कम मालकाने न भरल्यामुळे जप्त केलेले सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात लावलेले होते.२४ मे च्या दुपारी ४ वाजेनंतर व दि.२५ मे च्या सकाळी ८ वाजे दरम्यान कुणीतरी अज्ञात व्यक्तीने हे ट्रॅक्टर येथून नेले. हा प्रकार लक्षात आल्यावर महसूल प्रशासनाकडून धरणगाव पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पळवून घेवून गेलेलेटॅक्टर हे ट्रॉली मालकाकडे कसे?धरणगाव तहसील कार्यालयाच्या आवारात लावलेले एक विना पासिंगचे चांदसर येथील अवैध वाळू वाहतूक करणारे टॅक्टर (ट्रॉली क्र.बीएन ९६१३) हे अज्ञात इसमाने पळवून नेल्याची तक्रार दाखल आहे. ते दंड न भरता लांबविलेले चोरीचे गुन्हे दाखल असलेले ट्रॅक्टर चांदसर गावात फिरत असल्याची चर्चा आहे.चार गुन्हे दाखल मात्र तपासच सुरुमहसूल प्रशासनाने जप्त केलेले अवैध वाळूचे डंपर तसेच ट्रॅक्टर चोरी झाल्याचे चार गुन्हे धरणगाव पोलीसात दाखल झालेले आहेत. मात्र अद्याप एकाही घटनेचा तपास लागलेला नाही. हा तपास केव्हा लागाणार की वषार्नुवर्षे सुरुच राहणार का...? असा प्रश्न सुज्ञ नागरीक विचारत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी