भुसावळ : शहरातील एक महिला शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने खबरदरी म्हणून तिचा पती व मुलांसह संपर्कातील बारा जणांंना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले आहे. तर केअर कमिटीने तातडीची मिटिंग घेऊन शनिवारी रात्रीपासून १४ दिवस समतानगर परिसर सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.गांधी पुतळ्यापासून ते कंडारी पर्यंत दीड किलोमीटरचा परिसर १४ दिवसा पर्यत सील करण्यात आला आहे.राज्य सरकार व केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली कमिटीची मिटिंग घेण्यात आली. त्यावेळी उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार दिपक धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, मुख्याधिकारी करुणा डहाळे , बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, वैद्यकीय अधिकारी कीर्ती फलटणकर , रेल्वे हॉस्पिटल वैद्यकीय अधिकारी मिश्रा, जळगाव वैद्यकीय अधिकारी सुनील महाजन उपस्थित होते.कमेटीच्या मिटिंगमध्ये घेण्यात आलेले निर्णयानुसार कोणीही व्यक्तीला घराबाहेर निघता येणार नसून सकाळीसाडेसात वाजेच्या सुमारास समता नगर भागातील रहिवाशांचे घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीचे फॉर्म भरले जाणार आहे. सर्दी, खोकला यासारखे लक्षण आढळल्यास घटनास्थळी डाक्टर बोलावून त्यांचा उपचार केला जाणार आहे. तसेच कोरोनाचे लक्षण आढळल्यास सिव्हिल हॉस्पिटल मध्ये रवाना करण्यात येणार आहे. प्रशासन रात्रीपासून कामास लागले आहे. सील करण्यात आलेला परिसरात फवारणी व विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. करण्यात येणार आहे. तसेच परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक सेवा नगरपालिका प्रशासन पुरविण्याचा प्रयत्न करणार आहे.
भुसावळातील समतानगरसह दीड किलो मिटर परिसर सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 1:28 PM