बोदवड, जि.जळगाव :उन काळात मद्य विक्रीस बंदी असतानाही मद्य साठ्यात तफावत आढळल्याच्या कारणावरून येथील मनोज वाईन शॉपला सील ठोकण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज ही कारवाई केली.लॉकडाउन काळात मद्य विक्रीची दुकाने ३ मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. परंतु काही मद्य विक्रेत्यांकडून नियम धाब्यावर बसवून दारूची दुप्पट-तिप्पट दराने विक्री करण्यात आली होती. यानंतर मद्य विक्रीस शासनाकडून परवानगी देण्यात आली. ५ मे रोजी दुकानांमधील स्टॉकची तपासणी करण्यात आली. त्यात बोदवड शहरातील मनोज वाईन शॉपच्या तपासणीत मोठी तफावत आढळली. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या दुकानाचा परवाना रद्द केला आहे. दुकानातील नोंद वहीत काही नोंदी घेतल्या नसल्याचे तपासणीत आढळले.साठ्याच्या तुलनेत विदेशी मद्याच्या विविध क्षमतेच्या ५,४७९ बाटल्या, देशी मद्याच्या १०,९९४, बियरच्या १,४२८, वाईनच्या १२ बाटल्या कमी आढळल्या होत्या. त्यानंतर या दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
बोदवड येथे वाईन शॉपला ठोकले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 6:07 PM
बोदवड येथे मद्य साठ्यात तफावत आढळली.
ठळक मुद्देमद्य साठ्यात आढळली तफावतजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई