ऑनलाईन लोकमत
अमळनेर,दि.6- पाण्याचा शोध घेत असताना विहिरीत पडलेले तीन वर्षाचे हरीणला मंगरुळ येथील दोन शालेय विद्याथ्र्यानी वाचवले. जखमी हरणावर उपचार करण्यात आले.
मंगरुळ येथून जवळच असलेले जानवे शिवारात जंगलात हरणे, मोर, प्राणी आहेत. पाण्याचा शोध घेत तीन वर्षाचे हे हरीण मंगरुळ येथील शिरुड रस्त्यावरील एमआयडीसी समोरील विहिरीत पडले. ही बाब कै.अ.रा.पाटील माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी सागर सुरेश पारधी आणि दीपक खंडू कोळी हे मजुरीसाठी कारखान्यात जात असताना त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ विहिरीत उतरून हरणाला बाहेर काढले. हरीण जखमी झाले होते. किरण वारुळे यांनी वनपाल वाय.यू.पाटील यांना कळविले. त्यांनी तात्काळ अमळनेर येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात दाखल केले .डॉ.व्ही.बी.भोई व डॉ. एस. वाय.पाटील यांनी हरणावर उपचार केले. हरणाची प्रकृती चांगली झाल्यानंतर त्याला जानवे जंगलात सोडण्यात आले.