भुसावळ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मतदानाला प्रारंभ झाला असलातरी सकाळी साडेनऊ वाजेर्पयत मतदारांचा अत्यंत निरूत्साह सर्वच ठिकाणी दिसून आला. दुपार्पयत मतदानाचा टक्का काहीसा वाढला असलातरी दुपारी तीन वाजेनंतर सायंकाळर्पयत मतदान केंद्राबाहेर मतदानासाठी रांगा होत्या़ विभागात सरासरी 62 टक्के मतदान झाल़े नवमतदारांसह वयोवृद्धांनी मतदानासाठी हक्क बजावला़ 4भुसावळ : 50़89तीन गटांसह सहा गणांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी भुसावळ तालुक्यात 50़89 टक्के मतदान झाल़े एक लाख पाच हजार 180 मतदारांपैकी 53 हजार 521 मतदारांनी हक्क बजावला़ त्यात 29 हजार 29 पुरूष तर 24 हजार 492 स्त्री मतदारांनी हक्क बजावला़ साकरी येथे काही वेळ मशीन बंद पडल्याने प्रक्रिया खोळंबली मात्र लागलीच दुसरे मशीन लावण्यात आल़े खडका येथे उशिरार्पयत रांग लागली होती़ सकाळी साडेसात वाजता प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाली असलीतरी सकाळी साडेनऊ वाजेर्पयत सर्वच ठिकाणच्या मतदान केंद्रावर शुकशुकाट असल्याचे चित्र होत़ेसकाळी साडेसात ते 11़30 दरम्यान 17़5 टक्के मतदान झाल़े त्यात 17 हजार 933 मतदारांनी मतदान केल़े नऊ हजार 684 पुरूष तर आठ हजार 249 महिलांचा समावेश होता़ साडे सात ते दीड वाजे दरम्यान एकूण 22़15 टक्के मतदान झाल़े साडे सात ते साडे तीन दरम्यान 42़26 टक्के मतदान झाल़े 23 हजार 912 मतदारांनी एकूण मतदान केल़े4मुक्ताईनगर : 64़10तालुक्यातील चार गट व पंचायत समितीच्या आठ गणांसाठीच्या निवडणुकीत 134 मतदान केंद्रावर 64़10 टक्के मतदान झाल़े एकूण एक लाख 21 हजार 117 पैकी 77 हजार 634 मतदारांनी हक्क बजावला़ त्यात 41 हजार 169 पुरूष तर 35 हजार 465 स्त्री मतदारांचा समावेश होता. यंदा नवीन मतदारांमध्ये उत्साह दिसून आला तर सरासरी मतदान कमी झाले.गुरुवारी सकाळपासून संथ गतीने सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेत मतदारांनी दुपारी चार वाजेनंतर मतदानासाठी वेग धरला. सकाळपासून काही मतदान केंद्रावर शुकशुकाट होता. अशा मतदान केंद्रावर सायंकाळी मात्र मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मुक्ताईनगर शहरातील एका मतदान केंद्रावरील रांगेमुळे सव्वा सहापयर्ंत मतदान चालले. तीन ठिकाणी खोळंबली प्रक्रियातालुक्यात तीन ठिकाणी मतदान केंद्रावर बॅलेट मशीनचे बटन दाबत नसल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली होती तर अंतुर्ली येथे किरकोळ वाद झाला़ अनेक ठिकाणी मतदान केंद्राबाहेर उमेदवार व त्यांचे समर्थक गर्दी करून होत़े काही मतदान केंद्रावर बीएलओचा पत्ताच नव्हता.कोथळीत सकाळी 11 वाजता माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी प}ी मंदा खडसे अॅड.रोहीणी खडसे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला तर दुपारी दोन वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी शहरात मतदानाचा हक्क बजावला.4यावल : 61़43जि.प.च्या पाच तर पंचायत समितीच्या दहा गणासाठी झालेल्या निवडणुकीत 61़43 टक्के मतदान झाल़े गाढ:या, जामन्या, उसमळी, लंगडाआंबा या आदिवासी गावांमध्ये 82़93 टक्के इतके विक्रमी मतदान झाल़े तालुक्यात गुरुवारी सकाळी मतदानास प्रारंभ झाला. दुपारी दीड वाजेर्पयत मतदानांचा वेग मंदावला होता. कोठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. डांभूर्णी येथे रात्री आठ वाजेर्पयत मतदान प्रक्रिया चालली़ अट्रावल व भालोद येथे ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने ते बदलण्यात आल़े दुर्गम भागातील आंबापाणी 278 पैकी 198 मतदान झाल़े एकूण 98 टक्के मतदान झाल़े तालुक्यात शांततेत मतदान पार पडले. सकाळी साडेसात ते साडेनऊ वाजेर्पयत 6.36 टक्के, साडेअकरा वाजेर्पयत 15.21 टक्के तर दीड वाजेर्पयत मतदानाची टक्केवारी 26 .64 टक्के राहिली़ निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन हिरे परिस्थितीवर लक्ष ठेवून होत़े 4बोदवड : 65दोन गटासह चार गणांसाठी झालेल्या निवडणुकीत 50 हजार 636 पैकी 32 हजार 739 मतदारांनी मतदान केल़े एकूण 65 टक्के मतदान झाल़े वराड बु़।। गावात रात्री साडेआठ वाजेर्पयत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या़ शेलवड-साळशिंगी गटात 24 हजार 97 हजार मतदारांपैकी 16 हजार 520 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या गटात सरासरी 68 टक्के मतदान झाल़े याच गटातील वराड गावात रात्री 8.30 र्पयत मतदान सुरू होते. नाडगाव-मनुर बु.।। गटात एकूण 25 हजार 583 मतदारांपैकी 16 हजार 219 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या गटातील मतदानाची टक्केवारी 65 टक्के इतकी होती़4रावेरसहा गटासह 12 गणांसाठी एक लाख 78 हजार 824 मतदारांपैकी एक लाख 22 हजार 776 मतदारांनी हक्क बजावला़ एकूण 67़19 टक्के मतदान झाल़े त्यात 64 हजार 889 पुरूष तर 57 हजार 887 स्त्री मतदारांनी हक्क बजावला़ सकाळी 9.30 वाजेर्पयतच्या पहिल्या दोन तासात एक लाख 78 हजार 824 मतदारापैकी 14 हजार 51 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने अवघे 7.68 टक्के मतदान झाले. पाडळे बु.।। येथील नवरदेव मयूर अनिल महाजन यांनी लगAापूर्वी हक्क बजावला़सकाळी 9.30 ते 11.30 वाजे दरम्यान दोन तासात 22 हजार 413 मतदारांनी हक्क बजावल्याने 13.01 टक्के मतदान झाल़े दुपारी 3.30 वाजेर्पयत 18 हजार 556 मतदारांनी हक्क बजावला़ चिनावल येथे 85 टक्के मतदान झाले.8560 पैकी 5 हजार 565 मतदारांनी हक्क बजावला. विवरे येथे 64.50 टक्के मतदान झाले.तीन ठिकाणी बिघाडजानोरी, उदळी बु.।। व पाल येथील मतदान यंत्रात बटण दाबताना तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने ते मतदान यंत्र सील करून पर्यायी मतदान यंत्र लावण्यात आल़े
्रसकाळी शुकशुकाट़, दुपारनंतर लागल्या रांगा
By admin | Published: February 17, 2017 12:37 AM