भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील साकेगाव येथे महामार्गावर वाय पॉईंटजवळ मंगळवारी दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली होती. यातील एक ट्रक महामार्गावरच असून ट्रकचा मागून येणाºया वाहनाला समोरील वाहनाचा अंदाज न आल्याने पुढील कारचालकाने जागेवरच ब्रेक मारल्याने मागाहून दुचाकीवर येणारे जळगावचे दोघे जण कारवर आदळून जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली.२५ रोजी साकेगाव महामार्गावर दोन ट्रकांची समोरासमोर धडक झाली होती. यातील एका ट्रकला रस्त्याच्या कडेला केले व दुसरा ट्रक रस्त्यावरच उभा आहे.बंद पडलेल्या ट्रकच्या मागाहून अचानक समोर कार येत होती. त्याचवेळेस भुसावळकडून जळगावकडे कार जात असताना व त्यामागील पिंप्राळा (जळगाव) येथील रहिवासी रफिक समीर पिंजारी व साजेदा बी दुचाकी (एमएच-१९-बीबी-४५९२) कारच्या मागे होते. तेव्हा कारने अचानक जागेवरच ब्रेक मारला. त्यात दुचाकी कारवर आदळली. यात दुचाकीवरील दोन्ही गंभीर जखमी झाले.मागून दुचाकीने धडक दिल्याचे लक्षात येताच कारचालकाने कारसह पळ काढला.दरम्यान, अपघातानंतर जखमींचे नातेवाईक हारून पिंजारी व युनुस मन्सुरी हे जळगावकडे जात होते. त्यांनी दोघांना ओळखले व लगेच उपचारार्थ खासगी रुग्णालयात हलविले.साकेगाव येथे घटनास्थळी मंगळवारी झालेल्या अपघातातील ट्रक उभाच असल्यामुळे व त्याचा अंदाज येत नाही. यामुळे अजूनही अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.बंद पडलेला ट्रक रस्त्याच्या कडेला लवकरच करण्याची अपेक्षा वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे.
साकेगाव येथे दुसऱ्या दिवशी पुन्हा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 1:16 AM