जळगाव : शहरातील महापालिकेच्या पाच केंद्रांवर ४५ वर्षांच्या अधिक नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस उपलब्ध राहणार असून, दोन केंद्रांवर नोंदणीनुसार १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण होणार आहे, अशी माहिती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी दिली आहे. दरम्यान, कोव्हॅक्सिन संपल्याने चेतनदास मेहता रुग्णालय बंद राहणार आहे.
असे आहे नियेाजन
शहरातील शाहू महाराज रुग्णालय, शिवाजी नगरातील डी. बी.जैन रुग्णालय, शनिपेठेतील शाहीर अमर शेख रुग्णालय, कांताई नेत्रालय नानीबाई रुग्णालय या पाच ठिकाणी ४५ वर्षापेक्षा अधिक वयोगट कोविशिल्ड दुसरा डोस स्वाध्याय भवन, मुलतानी रुग्णालय या दोन केंद्रांवर कोविशिल्ड १८ ते ४४ वयोगट पहिला डोस
१४ हजार डोस येणार
कोविशिल्ड लसीचे पुन्हा १४ हजार डोस जिल्ह्याला बुधवारपर्यंत प्राप्त होणार आहे. हे डोस ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी त्यातही दुसऱ्या डोससाठी राखीव राहणार आहे. कोव्हॅक्सिनच्या डोसची मात्र प्रतीक्षा कायम आहे.