शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

दुसऱ्या पर्वात संयमाची लागणार कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 11:35 PM

मास्क न वापरणे, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर शिक्षेचा बडगा, सुरक्षित बाजारासारखे उपक्रम लॉकडाऊनमध्ये दिशादर्शक , शेतकरी आणि ग्राहकांमध्ये समन्वय साधण्याची सुवर्णसंधी

मिलिंद कुलकर्णीलॉकडाऊनचे दुसरे पर्व सुरु झाले. ‘जान है, तो जहान है’ असे म्हणणाºया पंतप्रधानांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या अनुभवानंतर ‘जान भी, जहान भी’ असा संदेश दिला आहे. २० एप्रिलनंतर रेड, आॅरेंज आणि ग्रीन झोन अशी विभागणी होऊन काही क्षेत्रातील व्यवहार सुरु करण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो. त्यामुळे आता पाच दिवसांनी काय होईल, हे बघायला हवे. २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा अनुभव सर्वव्यापी होता.वैयक्तिक पातळीवर लॉकडाऊनची कठोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. दोन प्रसंग कायद्याच्या पातळीवर पोहोचले. नवापूरमध्ये एका तरुणाने मास्क लावला नाही म्हणून पोलिसांनी हटकले. कोरोना हवेतून पसरत नाही, म्हणून मी मास्क लावणार नाही, असे तर्कट त्याने लढवले. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयाने पाच दिवस साधा कारावास आणि हजार रुपये दंड ठोठावला. बेजबाबदार वर्तन करणाºया नागरिकाला शिक्षा ठोठावण्याची राज्यातील ही पहिली कारवाई होती. अशीच शिक्षा नंदुरबारमध्ये ‘मॉर्निंग वॉक’साठी फिरणाºया २० नागरिकांना न्यायालयाने ठोठावली आहे. प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड केला.सार्वजनिक शिस्त, संयम हे गुण समाजातून हरवत चालले आहेत, त्याची ही दोन प्रातिनिधीक उदाहरणे आहेत. लॉकडाऊन हा निर्णय आपल्यासारख्या सगळ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे, हे लक्षात घेऊन खरे तर वागायला हवे. ‘नागरिक शास्त्र’ हा विषय आम्ही केवळ शाळेच्या अभ्यासक्रमात शिकतो, पण तो आचरणात आणला नसल्याने असे प्रसंग उद्भवत आहेत. भाजीबाजाराचा विषय तसाच आहे. कृषी उत्पादनांना वाहतूक आणि विक्रीसाठी कृषि विभाग परवानगी देतो, परंतु, भाजी आणि फळे घेऊन विक्रेते कोठेही बसून विकतात. सामाजिक अंतराचा प्राथमिक नियम धाब्यावर बसवून नागरिकदेखील तेथे गर्दी करतात. प्रशासनाने कारवाई किती वेळा करायची यालाही काही मर्यादा आहेत. त्यामुळे रोटरी क्लबसारख्या संस्थांनी पुढाकार घेत जळगावात ‘सुरक्षित बाजारा’सारखे उपक्रम राबविले. एकून तीन ठिकाणी असे बाजार सुरु झाले आहेत. त्याला प्रतिसाद चांगला मिळत आहे.लॉकडाऊन ही संधी मानून काही शेतकºयांनी ग्राहकाच्या दारात भाजी आणि फळे पोहोचविण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. समाज माध्यमांचा, डिजिटल तंत्रज्ञानाचा समर्थपणे वापर करीत शेतकरी आणि ग्राहक अशी साखळी तयार केली आहे. शेतकºयांची लूट होते, ही सार्वत्रिक तक्रार असताना अशा उपक्रमांमधूनच बाजारपेठा तयार झाल्या, तर दोन्ही घटकांचा लाभ होईल.लॉक डाऊनचे दुसरे पर्व सर्व भारतीयांसाठी संयम आणि स्वयंशिस्तीची कसोटी पाहणारा काळ राहील. आपल्या सुरक्षेसाठी तो पाळूया.२१ दिवसांचे पहिले संपले आणि १९ दिवसांचे लॉकडाऊनचे दुसरे पर्व सुरु झाले. पहिल्या पर्वात काही नागरिकांकडून नियमाची पायमल्ली झाली आणि त्याची शिक्षा यंत्रणेने दिली. कोरोनाचे संकट टाळण्यासाठी संयम, स्वयंशिस्त हवी.महसूल, पोलीस, आरोग्य या तिन्हीयंत्रणामध्ये माणसेच आहेत. आपलेच भाऊबंद आहेत. त्यांना सहकार्य केल्यास या यंत्रणेला मूळ कामाकडे अधिक लक्ष केंद्रित करता येईल. अकारण रस्त्यांवर येणे, मास्क न वापरणे, गर्दी करणे या गोष्टी टाळणे हे आपल्या हितासाठी आहे, हे लक्षात घ्यायला हवे. या यंत्रणेतील व्यक्तींना कोरोनाची बाधा होऊनही मनोबल कायम आहे, हे अभिमानास्पद आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव