जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत कोविड आणि नॉन कोविड अशा ४१६६ रुग्णांना महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेचे एक स्वतंत्र कार्यायलच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात आले आहेत. या योजेनेत अधिकाअधिक रुग्णांना समाविष्ट करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना वारंवार स्थानिक रुग्णालय प्रशासनाने दिल्या आहेत. त्या दृष्टीने रुग्णांकडून आधार कार्ड व रेशनकार्ड घ्यावे त्यांच्या नोंदणी कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, जिल्हाभरात या योजनेखाली ३३ रुग्णालये आहेत. मात्र, कोविडसाठी या योजनेअंतर्गत खाटा राखीव ठेवण्याबाबत संभ्रमावस्था असून केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय या दोन रुग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत उपचार होत असल्याची माहिती आहे.
दुसऱ्या लाटेत ४ हजारांवर रुग्णांना जनआरोग्य योजनेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 4:17 AM