आॅनलाईन लोकमतचोपडा, दि.६ - जीवनात उत्तुंग यश मिळवायचे असेल तर आहे त्या परिस्थितीला निर्मिडपणे सामोरे जाण्यामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होतो. मोठी स्वप्ने पाहुन सतत त्यांना पुर्ण करण्याचा विचार मनाशी ठेवला तर यश निश्चित मिळत असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध गिर्यारोहक आनंद बनसोडे यांनी केले.चोपडे शिक्षण मंडळ संचलित प्रताप विद्या मंदिराच्या शताब्दी सोहळ्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना बोलत होते. आपल्या मार्गदर्शनात बनसोडे यांनी सांगितले की, सर्वांनी आपला आतला आवाज ऐकणे गरजेचे आहे. ज्यामुळे स्वत: च्या प्रगतीसाठी योग्य दिशेने प्रयत्न करता येतात. इ.८ वी ते १२ वी च्या मुलांशी संवाद साधताना यशाची त्रिसूत्री मांडली. त्यात सकाळी लवकर उठून मनाशी ठरवलेल्या स्वप्नांची एक यादी करा व रोज उजळणी करुन हलका व्यायाम करा. प्राणायाम करुन दिवसाला सुरुवात करा असे केल्यास जगातील कोणतेही यश मिळविता येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी हालाकीची परिस्थिती असताना एव्हरेस्टस्वारी कशी पूर्ण केली त्याबाबत माहिती दिली. तसेच त्यांचे लेखन व चार खंडातील शिखरे कशी पादाक्रांत केली याबद्दल माहिती दिली.यावेळी डॉ.सुधीर चौधरी यांनी तयार केलेल्या ‘फिफा फुटबॉल’ सामन्यांबद्दलच्या हस्तलिखिताचे प्रकाशन आनंद बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.व्यासपीठावर चोपडे शिक्षण मंडळाचे चेअरमन राजा मयूर, उपाध्यक्ष मोरेश्वर देसाई, संचालक चंद्रहास गुजराथी, प्रफुल्ल गुजराथी, राजेंद्र अग्रवाल, शैला मयूर, डॉ. प्रवीणकुमार सप्तर्षी, ए.आर.पुणतांबेकर, डी.एस.सोनवणे, एस.एम.देशमुख, एस.टी.कुलकर्णी, जयश्री पुणतांबेकर, प्रसाद वैद्य, आर.बी.देशमुख, सुनील पाटील, डी.एस.पांडव, डी.व्ही.याज्ञिक, डी.के.महाजन, ए.टी.पाटील हजर होते. सूत्रसंचलन पी.पी.शिंदे यांनी तर आभार एस.आर.पाटील यांनी मानले.
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मोठे स्वप्न बघा : आनंद बनसोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 6:09 PM
चोपडा येथील प्रताप विद्या मंदिरातील शताब्दी महोत्सवात संवाद
ठळक मुद्दे‘फिफा फुटबॉल’ सामन्यांबद्दलच्या हस्तलिखिताचे प्रकाशनविद्यार्थ्यांशी संवाद साधताना मांडली यशाची त्रिसूत्रीप्रसिद्ध गिर्यारोहक आनंद बनसोडे यांनी केले मार्गदर्शन