फोटो : ९.४८ वाजेचे मेल, सागर दुबे नावाने
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जैन इरिगेशनचे सहकारी आर्टिस्ट विजय जैन यांच्या चित्राची आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या १०३ व्या वर्षीच्या ऑनलाइन प्रदर्शनातल्या व्यावसायिक गटात निवड झाली आहे.
आर्ट सोसायटी ऑफ इंडिया ही नावाजलेली संस्था दरवर्षी अखिल भारतीय पातळीवर चित्र प्रदर्शन आयोजित करत असते. या प्रदर्शनात तीन हजार ६०० कलाकृतींतून चित्राची निवड होत असते. या वर्षीचे चित्र प्रदर्शन कोविड विषाणूच्या साथीमुळे ऑनलाइन आयोजित करण्यात आले आहे. अखिल भारतीय पातळीवरील या चित्र प्रदर्शनात चार व्हर्च्युअल (आभासी) दालनात हे चित्र प्रदर्शित केली आहेत.
पेनाने रेखाटले चित्र
विजय जैन यांच्या २० चित्रांचा एक समूह या प्रदर्शनात आहे. यात चित्राचा आकार ३२४० इंच आहे. त्यांनी ही सर्व रेखाचित्रे लॉकडाऊनच्या काळात काढली आहेत. या काळात त्यांना सर्व रंग, कॅनव्हास आणि चित्रकलेचे साहित्य उपलब्ध होऊ शकले नाही. यामुळे त्यांनी ही चित्रे केवळ पेनाने कागदावर काढलेली आहेत.