चाळीसगाव/ पाचोरा : नगरपालिकेच्या विषय समिती सभापतींची निवड 4 रोजी झाली. या निवडीत चाळीसगाव येथे भाजपाचे तर पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. स्थायी समिती सभापतीपदी पदसिद्ध म्हणून नगराध्यक्षांचीच निवड झाली आहे. चाळीसगाव व पाचोरा या दोन ठिकाणी अनुक्रमे भाजपा आणि शिवसेनेचीच सत्ता आहे. चाळीसगावात 6 पैकी भाजपाचे 3, शिवसेनेचे 2 व 1 अपक्ष असे सभापती झाले आहेत. पाचो:यात समिती सभापती निवडीत अंतर्गत तडजोडीतून राष्ट्रवादीला अधिक संधी मिळू शकली. उपनगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीने छुपी साथ दिल्याने आता राष्ट्रवादीला तशीच साथ सेनेची मिळाली. 6 पैकी 3 सभापती राष्ट्रवादीचे असून एक सेनेचा व एक जनाधार आघाडीचा आहे. चाळीसगाव नगरपरिषदेच्या सभागृहात 4 रोजी विषय समिती सभापतींची निवडणूक तहसीदलार कैलास देवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत सभापतींची निवड बिनविरोध करण्यात आली. सभेला सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग, कार्यालय प्रमुख विजय खरात आदी उपस्थित होते. पाचोरा नगरपरिषदेच्या विविध विषय समितीच्या सभापतींची शनिवारी जाहीर करण्यात आली. 9 जानेवारी रोजी झालेल्या विशेष सभेनुसार स्थायी समिती सदस्य म्हणून राम ग्यानचंद केसवाणी व संजय ओंकार वाघ यांना नामनिर्देशित करण्यात आलेले असून उर्वरित सहा समित्यांवर प्रत्येकी एकच नामनिर्देशन प्राप्त झाल्याने विविध समित्या व त्यांच्या सभापतींची घोषणा तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी खालीलप्रमाणे केली.यावेळी नगराध्यक्ष संजय गोहील, मुख्याधिकारी किरण देशमुख व सर्व नगरसेवक उपस्थित होते. (वार्ताहर)समिती व सभापती..चाळीसगाव: सा.बां. समिती- विजया प्रकाश पवार, शिक्षण - शेखर कन्हैयालाल बजाज, स्वच्छता वैद्यकीय व सार्व. आरोग्य - घृष्णेश्वर रामकृष्ण पाटील, पाणीपुरवठा व जलनिस्सारण- शामलाल वामनराव कुमावत, महिला व बालकल्याण- विजया भिकन पवार, नियोजन व विकास- आशाबाई रमेश चव्हाण. स्थायी समिती - आशालता विश्वास चव्हाण, पदसिध्द सदस्य- आशाबाई रमेश चव्हाण, सदस्य राजेंद्र चौधरी, राजीव देशमुख, सुरेश स्वार, विजया स्वार, शेखर बजाज, घृष्णेश्वर पाटील, विजया पवार. पाचोरा: सा.बां. समिती- सुचेता दिलीप वाघ, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य. - विकास संतोष पाटील, स्वच्छता, वैद्यकीय व सार्व. आरोग्य - प्रियंका वाल्मीक पाटील, पाणीपुरवठा व जलनिस्सारण -वासुदेव भिवसन माळी, नियोजन आणि विकास- शरद बाळकृष्ण पाटे, महिला व बालकल्याण - सईदाबी शब्बीर खान. स्थायी समितीचे पदसिध्द सभापती नगराध्यक्ष संजय गोहील तर उपसभापती शरद बाळकृष्ण पाटे.
विषय समिती सभापतींची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2017 12:53 AM