जळगाव : जादा दराने दारुची विक्री केल्याप्रकरणी महापौर सीमा सुरेश भोळे यांच्या निलम वाईन्स (पोलन पेठ) या दारु दुकानाला जिल्हाधिकाºयांनी ४० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक एम. बी. सोनार यांनी ११ आॅगस्ट २०१८ रोजी पोलन पेठेतील ‘निलम वाईन्स’ या दारु दुकानावर दारु घेण्यासाठी डमी ग्राहक पाठविले होते. १८० मि.लि.ची २८० रुपयांना मिळणारी दारुची बाटली २८५ रुपयाला देण्यात आली. पाच रुपये जास्त दराने दारुची विक्री केल्याचे निष्पन्न झाले होते.त्यामुळे सोनार यांनी नोकरनामाधारक मुकुंदा भास्कर कोल्हे यांचा जबाब घेऊन पंचनामा केला व शेरेपुस्तकात त्याची नोंद केली. त्यानंतर सोनार यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस. एल. आढाव यांच्याकडे अहवाल पाठविला होता.अंतिम कारवाई व दंडाचा अधिकार जिल्हाधिकाºयांना असल्याने आढाव यांनी सोनार यांनी केलेल्या तपासणीचा अहवाल जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी ही कारवाई केली.महापौरांनी खुलाशात केली चूक मान्यजास्त दराने दारु विक्री केल्याबाबत कारवाईपूर्वी जिल्हाधिकाºयांनी अनुज्ञप्तीधारक सीमा भोळे यांना नोटीस पाठवून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावर भोळे यांनी सादर केलेल्या खुलाशात म्हटले आहे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी डमी ग्राहक पाठवून दारुची बाटली खरेदी केली व त्यात पाच रुपये जास्त आकारण्यात आले. दुकानावरील नोकर हा नवीन असल्याने त्याने जादा दराने दारुची विक्री केली. मी महिला असल्याने दुकानावर थांबत नाही. नोकरामार्फतच व्यवहार चालत असल्याने ही चूक झाली आहे. तरी खुलाशाचा सहानुभूतीपुर्वक विचार करुन कमीत कमी दंड आकारुन अथवा ताकीद देऊन प्रकरण सामोपचाराने प्रकरण मिटवावे असे खुलाशात म्हटले आहे.काय आहेत जिल्हाधिका-यांचे आदेशनिलम वाईन्स येथे दुय्यम निरीक्षकांनी निरीक्षण केले असता विदेशी मद्याची विक्री ‘अ’ प्रमाणे ५ रुपये जास्त घेऊन करण्यात येत होती. अनुज्ञप्तीधारकानेही चूक मान्य केलेली आहे. शासकीय महसुलाचा विचार करता अनुज्ञप्ती रद्द अथवा निलंबित न करता तडजोड शुल्क म्हणून ४० हजार रुपयांचा दंड करण्यात येत आहे, असे जिल्हाधिका-यांनी आदेशात म्हटले आहे.निलम वाईन्स हे दारुचे दुकान साडूला भाडे कराराने चालवायला दिले आहे. त्यामुळे दंडाच्या कारवाईबाबत मला माहिती नाही.-सुरेश भोळे, आमदार
जादा दराने दारु विक्री; जळगावच्या महापौरांच्या दुकानाला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:54 PM
जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
ठळक मुद्देबनावट ग्राहकद्वारे पडताळणीमहापौरांनी खुलाशात केली चूक मान्य