लोकमत ऑनलाईन तोंडापूर ता.जामनेर, दि.14 : परतीच्या पावसाने सतत चार दिवस थैमान घातल्याने तोंडापुरसह परिसरातील बहुसंख्य शेतक:यांचा कापूस शेतातच ओला झाला आहे. या ओल्या कापसाची झटपट वेचणी करुन शेतक:यांनी हा कापूस घरात न ठेवता मिळेल त्या भावात विकणे सुरू केले आहे. आणि हा कापूस घेण्यासाठी व्यापारीदेखील सरसावले असून शनिवारी सकाळपासूनच येथील कापूस व्यापा:यांच्या दुकानांवर शेतक:यांची मोठी वर्दळ होती. पाच ते सात हजार रुपये क्विंटलने विकल्या जाणा:या कापसाला मात्र पावसाचा फटका बसून तो चक्क अडीच ते तीन हजार रुपये क्विंटलर्पयत खरेदी करण्यात आला. परिणामी शेतक:यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. सकाळपासून रिक्षा, ट्रॅक्टर, बैलगाडय़ांमध्ये शेतक:यांनी कापूस भरून आणल्याने येथील बसस्थानक परिसरातला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. परिसरात तब्बल पंधरा ते वीस व्यापारी दुकानाबाहेर कापूस खरेदीसाठी काटे लाऊन बसले होते.
मिळेल त्या भावात कापूस विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 7:17 PM
तोंडापूर ता. जामनेर परिसरात परतीच्या पावसामुळे ओला झालेला कापूस झटपट वेचून शेतकरी व्यापा:यांना विकत आहेत.
ठळक मुद्दे बसस्थानक परिसराला जत्रेचे स्वरूपकापसाला क्विंटलला केवळ अडीच ते तीन हजाराचा भावव्यापारीही माल घेण्यासाठी सरसावले.