जळगाव : व्यापार व व्यावसायातील वाढती स्पर्धा आणि ग्राहकांमध्ये असलेली जनजागृती यामुळे शहरातील शॉपिंग मॉलमध्ये बहुतांश वस्तू या एमआरपीपेक्षा कमी किंमतीत विक्री होत आहेत. बस स्टॅण्ड आहे त्या किंमतीने तर रेल्वे स्टेशनवर मात्र जादा दराने विक्री होत असल्याचे‘लोकमत’ने केलेल्या स्टींग ऑपरेशनमध्ये उघड झाले.स्टींग ऑपरेशन कशासाठी ?ग्राहकाच्या हक्काचे जतन करण्यासाठी ग्राहक पंचायतीमार्फत मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात येत असते. एमआरपीपेक्षा जादा दराने वस्तुची विक्री होत असल्यास त्याबाबत ग्राहक मंचमध्ये संबधित विक्रेत्याविरूद्ध तक्रार करण्याचा हक्क ग्राहकाला आहे. मात्र तरीदेखील काही ठिकाणी वस्तुवरील एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी असल्याने नेमकी स्थिती काय? याची पडताळणी करण्यासाठी ‘लोकमत’ मार्फत स्टींग ऑपरेशन करण्यात आले.शॉपिंग मॉलमध्ये सूट‘लोकमत प्रतिनिधी’ दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास शिरसोली नाक्यावरील एका शॉपिंग मॉलमध्ये खरेदीसाठी दाखल झाला. या ठिकाणी प्रतिनिधीने 100 ग्रॅम किंमतीचे बिस्कीटचे काही पुडे खरेदी केले. त्यावर 20 रुपये एमआरपी प्रिंट होती. त्यानंतर प्रतिनिधीने आफ्टर शेव्हींग लोशनची खरेदी केली. त्यावर 125 रुपये एमआरपी होती. मॉलमधील काऊंटर चालकाने बिस्कीट पुडय़ाचे 17 रुपये प्रमाणे 34 तर आफ्टर शेव्हींग लोशनचे 110 रुपये बिलाची आकारणी केली.यात शॉपिंग मॉलकडून 21 रुपयांची सूट देण्यात आली. यासोबतच शॉपिंग मॉलमध्ये ऑफर सुरु असल्याने विंटर क्रीम देखील मोफत दिली. एस.टी.स्टॅडवर एमआरपीनुसार आकारणीप्रतिनिधी दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानकात दाखल झाला. याठिकाणी एस.टी.स्टॉलवर असलेल्या खाद्यपर्दार्थाच्या किंमतीची विचारणा केली. स्टॉलवरील शेगदाणा चिक्कीची खरेदी केली. 12 रुपये एमआरपीची चिक्की 10 रुपयांमध्ये मिळाली. शुद्ध पाण्याच्या बॉटलीची एमआरपीनुसार 20 रुपयांची रक्कम आकारली. त्यानंतर प्रतिनिधी एस.टी.कॅन्टीनमध्ये दाखल झाला. या ठिकाणी बिस्कीट पुडे व पाण्याच्या बॉटलच्या किंमतीची विचारणा केली. कॅन्टीनमालकाने एमआरपीनुसार किंमतीची आकारणी केली.खाद्य पदार्थातील हानीकारक घटक, भेसळ याबाबत तक्रार करायची असल्यास ग्राहकांना अन्न व औषध विभाग, जळगाव. फोन 0257/ 2217476 या ठिकाणी तक्रार करता येईल.जिल्हास्तरावर ग्राहकांच्या तक्रारीनुसार कारवाई न झाल्यास अन्न व औषध विभाग, मुंबई. फोन नं. 022/ 26592756 या ठिकाणी ग्राहकांना तक्रार करता येईल.रेल्वे स्टेशनवर जादा दराने विक्री़़़ ‘लोकमत’प्रतिनिधी रेल्वे स्टेशनवर दाखल झाला. या ठिकाणी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर असलेल्या रेल्वेच्या अधिकृत विक्रेत्याकडे 300 मिली शितपेयाच्या बॉटलची मागणी केली. विक्रेत्याने एक रुपये जादा आकारणी केली. त्याबाबत विचारणा केली असता शितपेय कुलींगसाठी एक रुपया जादा घेण्यात येत असल्याचे समर्थन त्याने केले. त्यानंतर प्रतिनिधी दुस:या स्टॉलवर चौकशीसाठी पोहचला. या ठिकाणी दोन बिस्कीट पुडे घेतल्यानंतर एमआरपीपेक्षा एक रुपये जादा आकारणी विक्रेत्याने केली.
‘एमआरपी’पेक्षा जादा दराने विक्री
By admin | Published: January 25, 2017 1:11 AM