जळगाव : कोरोनोच्या काळात ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने आॅडियो क्लिपच्या माध्यमातून विचारपूस व समस्या जाणून घेतल्या जात आहेत.जगभर कोरोनाने थैमान घातले असून भारत सरकार व महाराष्ट्र शासन आणि स्वयंसेवी संस्था विविध पातळीवर प्रयत्न करीत आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार सेवा विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांशी आॅडिओ क्लीपच्या माध्यमातून संपर्क साधला जातआहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेण्यासोबतच कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.समस्यांचे स्वरूप व निकड पाहून विद्यापीठामार्फत निरसन व मदत केली जात आहे.समस्यांचे निरसनसन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात या विभागाच्यावतीने विद्यापीठ परिक्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर व इतर कार्यक्रम घेण्यात आले होते. त्यानिमित्ताने विभागाकडे ज्येष्ठ नागरिकांचे संपर्क क्रमांक उपलब्ध आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून कुलगुरू प्रा.पी पी पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून प्र- कुलगुरू प्रा.पी.पी. माहूलीकर प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचे संचालक प्रा. मनिष जोशी व विभागातील सहाय्यक सुभाष पवार, महेश जडे हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघाचे माजी अध्यक्ष डी.टी. चौधरी यांनी विद्यापीठा मार्फत कोरोनाच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना धीर देण्याचे व सहकार्य करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत त्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.
‘आॅडिओ क्लिप’च्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांची घेतली जातेय काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 7:55 PM