राज्य सॉफ्ट टेनिस स्पर्धा, सबज्युनियर गटात मात्र आव्हान संपुष्टात
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस संघटनेने आयोजित केलेल्य राज्य सॉफ्ट टेनिस स्पर्धेत जळगावच्या मुलांच्या संघाने वरिष्ठ गटात अंतिम फेरीत धडक मारली आहे. या संघाचा सामना अंतिम फेरीत औरंगाबाद सोबत होणार आहे. तर सबज्युनियर गटात उपांत्य सामन्यात जळगावला सोलापूरकडून पराभव पत्करावा लागला. शनिवारी मुलींच्या स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस संघटनेचे अध्यक्ष नितीन पूर्णपात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी कुलभूषण पाटील राज्य सहसचिव रवींद्र सोनवणे, दीपक आर्डे, सागर पाटील, अमोल पाटील, जयांशू पोळ, कृपालसिंग ठाकूर उपस्थित होते.
सबज्युनिअर मुलांच्या गटात पहिल्या उपांत्य सामन्यात सोलापूरने जळगावला पराभूत केले. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात उस्मानाबादने बुलडाणा संघावर विजय मिळवला. त्यानंतर तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात जळगावने बुलडाणा संघाला पराभूत केले. या गटातील अंतिम सामना उद्या सकाळी होणार आहे.
वरिष्ठ सॉफ्ट टेनिस मुलांच्या गटात पहिला उपांत्य सामना औरंगाबाद वि. उस्मानाबाद यांच्यात झाला. त्यात औरंगाबाद २-१ असा विजय मिळवला. तर उपांत्य सामना जळगाव वि. सोलापूर यांच्यात झाला. त्यात जळगाव संघाने २-० असा विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला.