शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

ज्येष्ठ साहित्यिक  डॉ. किसन पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 12:43 AM

डॉ. किसन पाटील यांना न्युमोनिया, जंतू संसर्ग झाल्याने गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते

ठळक मुद्देआज अंत्यसंस्कारशिक्षण, साहित्य क्षेत्रात भूषविले विविध पदे

जळगाव : महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष, प्राचार्य तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. किसन पाटील (६७, रा. शिवकॉलनी) यांचे मंगळवार, २ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अल्प आजाराने निधन झाले.

डॉ. किसन पाटील यांना न्युमोनिया, जंतू संसर्ग झाल्याने गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. या दरम्यान त्यांची कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली होती. मात्र उपचार सुरू असतानाच मंगळवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे.माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. किसन पाटील हे उत्तम समीक्षक, संशोधक, लोकभाषा व लोक संस्कृतीचे गाढे अभ्यासक म्हणून ते महाराष्ट्राला परिचित होते. त्यांचा स्वभाव हा नेहमी हसरा आणि मनमिळावू होता. त्यांच्या अचानक निधनाच्या बातमीने मोठा धक्का बसला असून, त्यांच्या रूपाने साहित्य क्षेत्रातील एक `उमदे `व्यक्तिमत्व हरपल्याच्या  शोकसंवेदना जिल्ह्यातील  साहित्यिकांनी  व्यक्त  केल्या.

लोकसाहित्याच्या पर्वाचा अस्त

कवितासंग्रह, बालकवितासंग्रह, लोकसाहित्याचे लिखाण, विविध साहित्याचे संपादन, वैचारिक लेखसंग्रह, विविध मंडळांवर पदाधिकारी, अभ्यासक, विविध ग्रंथांना प्रस्तावना अशा विविध साहित्याचे धनी असलेले प्राचार्य किसन पाटील यांच्या निधनाने लोकसाहित्याच्या पर्वाचा अस्त झाल्याच्या प्रतिक्रिया साहित्य क्षेत्रातून उमटत आहे.

शिक्षण, साहित्य क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही भरीव योगदान असलेल्या प्राचार्य किसन महादू पाटील यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले आणि खान्देशातील साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या चाहत्यांना, साहित्यिकांना तसेच शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला.

शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान

डॉ. किसन पाटील हे मूळ राहणार वाघोड, ता. रावेर येथील रहिवासी होते. रावेर येथील सरदार जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कलाशिक्षक म्हणून त्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातील कार्याला सुरुवात केली. त्यानंतर मू. जे. महाविद्यालयात पदव्युत्तर मराठी विभागाचे प्रमुख म्हणून जळगावात आले व ते जळगावकरच झाले. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता, एसएनडीटी महिला महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी यशस्वी धुरा संभाळली.

विविध पदांचे धनी

जळगावात झालेल्या खान्देशस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रणित अखिल भारतीय मराठी जनसाहित्य संमेलन (मोझरी, अमरावती), ५७ वे अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलन (मुक्ताईनगर), राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन (पाचोरा) अशा विविध संमेलनांमध्ये त्यांनी अध्यक्षपदाची धुरा संभाळली होती.

स्मरणात राहणारे साहित्य योगदान

कवितासंग्रह, बालकवितासंग्रह, लोकसाहित्याचे त्यांनी लिखाण केले. या सोबतच विविध साहित्याचे संपादन, वैचारिक लेखसंग्रह यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. कुमारभारती, युवक भारती यातही योगदान देत मराठी भाषेच्या आठ पाठ्यपुस्तकांसाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणावर कार्य केले. विविध मंडळांवर पदाधिकारी, अभ्यासक म्हणूनही त्यांची वेगळी ओळख राहिली. विविध ग्रंथांना प्रस्तावना, अनेक भाषणे, व्याख्याने, अध्यक्षीय भाषणे, संशोधन मार्गदर्शक, आकाशवाणी-दूरदर्शन कार्यक्रमात सहभागदेखील स्मरणात राहणारा आहे.

तीन कवितासंग्रह, दोन बालकवितासंग्रह, दोन लोकसाहित्याचे संशोधन, तीन गौरवग्रंथ, लोककथा आणि कोळी गीतांचे संपादन, समीक्षा, लेखमाला असे विपुल साहित्य प्राचार्य किसन पाटील यांच्या हातून आकाराला आले.

शिक्षण, साहित्य क्षेत्रात भूषविले विविध पदे

मंडळांचे कार्यकारी सदस्य, विविध साहित्य संघ, शिक्षण क्षेत्रातील स्थानिक व्यवस्थापन सामिती, जनसंवाद व पत्रकारिता विभागात लघुशोध प्रकल्प विविध ग्रंथांना प्रस्तावना यातही त्यांचा लक्षणीय सहभाग राहिला.

आज अंत्यसंस्कार

प्राचार्य किसन पाटील यांच्या पार्थिवावर बुधवार, ३ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव