जळगाव : शहरातील निवृत्ती नगर परिसरात पाण्याची समस्या निर्माण होत असून, याबाबत ‘लोकमत’ ने रविवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केल्यानंतर महापौर भारती सोनवणे यांनी सोमवारी निवृत्ती नगरात जावून त्या ठिकाणच्या नागरिकांशी चर्चा केली. ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेत महापौरांनी या भागात पाहणी करून, नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच व्हाल्वची व्यवस्था न करता स्वतंत्र पाईनची जोडणी करण्याचा सूचना महापौरांनी पाणी पुरवठा विभागाला दिल्या आहेत.निवृत्ती नगरात गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. शनिवारी नागरिकांनी मनपा अभियंत्यांना घेराव घालत पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती.सोमवारी महापौर भारती सोनवणे यांच्यासह नगरसेवक कैलास सोनवणे, मयूर कापसे, नगरसेविका प्रतिभा देशमुख,माजी नगरसेवक चंद्रकांत कापसे, विजय पाटील गजानन देशमुख, अभियंता शिरसाठ, व्हॉल्वमन अल्ताफ पठाण व नागरीक उपस्थित होते.या भागात पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याने मनपाने ती अडचण सोडवण्यासाठी त्या ठिकाणी नवीन व्हॉल्व्ह बसवला तसे केल्याने तीन गल्ल्यांना पाणी कमी दाबाने येऊ लागले.गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांची ओरड होत असल्याने पाण्यावरून वाद होत होते. त्यामुळे या परिसराला योग्य दाबाने पाणी पुरवठा होण्यासाठी गुजराल पेट्रोल पंपापासून नवीन पाईपलाईन जोडणी करणे आवश्यक असल्याचे अभियंत्यांनी लक्षात आणून दिले.महापौरांनी त्यासाठी तात्काळ प्रस्ताव तयार करून सादर करावा, अशा सूचना केल्या.
निवृत्ती नगरसाठी स्वतंत्र जलवाहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 12:49 PM