शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दोन दिवसात निर्णय न झाल्यास गंभीर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 1:05 PM

जळगाव : ज्या तीन महिन्यांच्या व्यवसायातून आमचा नऊ महिन्यांचा खर्च निघत होता. त्या तीन महिन्यात एकाही पैशाची कमाई झाली ...

जळगाव : ज्या तीन महिन्यांच्या व्यवसायातून आमचा नऊ महिन्यांचा खर्च निघत होता. त्या तीन महिन्यात एकाही पैशाची कमाई झाली नाही. कोरोना केवळ व्यापारी संकुलातील दुकानांमुळेच होत आहे का? दाणाबाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, त्यामुळे कोरोनाचा फैलाव होत नाही का? असे प्रश्न उपस्थित करून व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला.११६ दिवस बंदीस्त असलेल्या व्यापारी संकुलासंदर्भात पुढील दोन दिवसात सकारात्मक निर्णय न झाल्यास जे काही परिमाण होतील, त्याची जबाबदारी प्रशासन अन् शासनाची राहिल, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून आजतागायत दुकान बंद राहिल्यामुळे नाही तर भुकेने मरण्याची वेळ आमच्यावर आली आहे, असे या व्यापाºयांनी सांगितले. ‘आम्ही जळगावात राहतो, हे आमचे दुर्भाग्य आहे का?’ या बॅनरखाली आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यापाºयांनी संताप व्यक्त केला.शासनाच्या धोरणामुळे शहरातील व्यापारी संतप्त झाले असून यातून मार्ग काढण्याची मागणी करीत आहेत.नाकर्तेपणा व्यापाºयांच्या माथी का मारला ?नटवर कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष सपन झुनझुनवाला यांनी ‘आपला नाकर्तेपणा व्यापाºयांच्या माथी का मारला? ११६ दिवस झाले, आमची दुकाने बंद आहेत, तरी जळगावमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे का? असा सवाल त्यांनी केला. फुले मार्केटचे कार्याध्यक्ष राजेश वरयानी यांनी ११६ दिवसात लग्नसराई, रमजान महिना, शालेय युनिफॉर्म अशा स्वरुपाचा व्यवसाय पूर्णपणे बंद होता. त्यामुळे आमचे संपूर्ण भाडे, घरपट्टी माफ करण्याची मागणी केली. सेंट्रल फुले मार्केटचे माजी अध्यक्ष प्रदीप जैन यांनी उपायुक्तांना केवळ कारवाईसाठी फुले मार्केट व बळीराम पेठेतील दुकानेच दिसतात का? असा सवाल करून आपण कोणत्या कायद्यानुसार दुकाने सील करता अन् पाच, दहा हजार दंड आकारता? असा प्रश्न केला.यावेळी सराफ व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष स्वरूप लुंकड, सेंट्रल फुले मार्केटचे अध्यक्ष रमेश मताणी, नटवर कॉम्प्लेक्सचे कोषाध्यक्ष विजय अग्रवाल, नाथ प्लाझाचे अध्यक्ष नितीन वाणी, व्यापारी प्रदीप जैन, भास्कर मार्केटचे राजेश पिंगळे, स्टेडियम कॉम्प्लेक्समधील ललित पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संजय हिराणी यांनी केले.व्यापारीही उतरले रस्त्यावरअनलॉक झाले असले तरी महापालिकेने केवळ रस्त्यावरील दुकानांना सम-विषम पद्धतीने व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली असून संकुलांमधील दुकाने उघडण्यास अजूनही परवानगी दिलेली नाही. मंगळवारी सात दिवसांच्या लॉकडाऊननंतर दुकाने उघडतील या आशेने बी.जे.मार्केट, महात्मा फुले, गोलाणी, महात्मा गांधी मार्केटबाहेर संकुलामधील दुकानदारांनी मोठी गर्दी केली होती. १२० दिवसांपासून दुकाने बंद असल्याने प्रशासनाने आता संकुलामधील दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी व्यापाºयांनी केली.सरकारी कर्मचाºयांना पगार नाही, मग..?शासनाकडे विविध मार्गांनी महसूल येतो. तरीही मुख्यमंत्री आरोग्य कर्मचारी, पोलिस यांचे पगार देऊ शकत नाही. म्हणे, शासनाकडे पैसा नाही. मुख्यमंत्री आम्हाला सांगतात की, कोणत्याही कर्मचाºयाचा पगार कापू नका. शासनाकडे पगार द्यायला पैसे नसतील तर आमच्याकडे सोन्याचे हंडे भरून ठेवलेत का? असा सवाल सराफ व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष स्वरुप लुंकड यांनी केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव