आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १२ - रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असल्याने कोणत्याही बिकट प्रसंगी आम्ही ही सेवा सतर्कपणे करीत असतो. या रुग्णसेवेतूनच परमार्थ साधला जावू शकतो, अशा भावना जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी व्यक्त केल्या.परिचारिका दिनाच्या पार्श्वभूमीवर ११ मे रोजी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात परिचारिकांशी संवाद साधला, त्या वेळी त्यांनी वरील भावना व्यक्त करीत विविध कटू, गोड अनुभव सांगितले. या वेळी परिसेविका जयश्री बागूल, सुरेखा नानीवडेकर, अधिपरिचारिका योगिता नागरे, रत्नप्रभा पालीवाल, दिव्या सिंग उपस्थित होत्या. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले.कोणत्याही प्रसंगी तत्परजिल्हा रुग्णालयात २४ तास कोणत्याही प्रसंगी गंभीर अथवा सामान्य रुग्ण येत असतात. त्यामुळे येथे नेहमी सतर्क राहून कर्तव्य बजवावे लागते. यामध्ये कोणत्याही रुग्णावर चांगल्यात चांगले व तत्काळ उपचार होण्यासाठी सर्वच परिचारिका कसोशीने प्रयत्न करीत असतात. यामध्ये कोणताही सणवार असो, कोणतीही शिफ्ट असो त्याचा विचार न करता रुग्णसेवेतच ईश्वरसेवा मानून या कामात पूर्णपणे झोकून देत असते, असे या वेळी नमूद करण्यात आले.योग्य सन्मान मिळावाआपले कर्तव्य पार पाडत असताना अनेक राजकीय मंडळींचे कार्यकर्ते असो इतर कोणीही येऊन राजकीय नेत्यांचे नाव सांगत कामांमध्ये अडथळे निर्माण करीत असल्याचाही अनुभव या वेळी सांगण्यात आला. या सोबतच रुग्णांचे नातेवाईकही बऱ्याचवेळी उपचारादरम्यान हस्तक्षेप करीत उद्धटपणे बोलतात, अशीही खंत या वेळी व्यक्त करीत प्रत्येक परिचारिकेला सन्मान मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली.बदलीबाबत निकष आवश्यकरुग्णालयातील कामांचा अनुभव सांगण्यासह शासकीय पातळीवरील अडीअडचणींचाही या वेळी उल्लेख करण्यात आला. परिचारिकांची बदली करताना आरोग्य विभागाने किमान त्यांच्या वयाचा विचार करीत ५५ वर्षे वयाच्या पुढे असलेल्या परिचारिकांची बदली करू नये, असा मुद्दा या वेळी मांडण्यात आला.प्रशिक्षित परिचारिकांना कायम कराएकीकडे शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्रांमधून प्रशिक्षण तर दिले जात आहे, मात्र प्रशिक्षण घेतलेल्यांना नोकरीत कायमस्वरुपी सामावून घेतली जात नसल्याची खंत या वेळी व्यक्त करण्यात आली. केवळ ११ महिन्यांचा करार करून कामावर घेतले जाते व ११ महिन्यांनंतर दोन-तीन महिन्यांचा खंड देत दुसºयाच विभागासाठी करार केला जातो तर अनेकांशी पुन्हा करार केला जात नाही, अशा अडचणी यावेळी मांडण्यातआल्या.नोकरीसाठी लढाप्रशिक्षण पूर्ण केलेल्या परिचारिकांना २०११नंतर कायम केलेले नाही. त्यामुळे २०१२ ते २०१६ या कालावधीत प्रशिक्षण घेतलेल्या परिचारिकांच्यावतीने नोकरीसाठी लढा दिला जात आहे. त्यांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घ्यावे, यासाठी त्यांची धडपड सुरू असली तरी त्याची दखल अद्यापपर्यंतही घेतली गेली नसल्याचे या वेळी सांगण्यात आले.मद्यपींचाही त्रासजिल्हा रुग्णालयात येणाºयांमध्ये काही रुग्णांचे नातेवाईक मद्यपान करूनही येत असतात. त्यामुळे महिलांना मोठा त्रास होतो. त्यांच्या उद्धटपणाला सामोरे जावे लागते, अशा समस्याही या वेळी मांडण्यात आल्या. त्यामुळे येथे सुरक्षायंत्रणा वाढविण्याची गरज असल्याचा उल्लेख करण्यात आला. अनोळखींची सेवा जिल्हा रुग्णालयात अनेक अनोळखी रुग्ण येत असतात. त्यांची सेवा करीत त्यांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहचविण्याचा आनंद वेगळाच असतो, असे गोड अनुभवही या वेळी सांगण्यात आले.
परिचारिका दिन : रुग्णसेवेतूनच परमार्थ सिद्धी, परिचारिकांचा सेवाभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:47 PM
जळगाव जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी व्यक्त केल्या भावना
ठळक मुद्देकोणत्याही प्रसंगी तत्परयोग्य सन्मान मिळावा