नीलाक्षीने मराठी विषयात शंभरपैकी ९७ गुण, इंग्रजीमध्ये ९६ गुण, संस्कृतमध्ये शंभरपैकी १००, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिकशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये शंभरपैकी ९९ गुण मिळवले आहेत. बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये नीलाक्षी बाविस्कर हिला एकूण ४९४ मार्क्स मिळाले, तर बोर्डाकडून सहा गुण देण्यात येऊन पाचशेपैकी ५०० गुण मिळवले आहेत. पंजाबराव बाविस्कर हे हातेड येथील शिवाजी हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून सेवेत आहेत. त्यांना तिळे मुले असून त्यातील नीलाक्षी ही एक आहे, तर उर्वरित दोन मुलांमध्ये निशू पंजाबराव बाविस्कर यानेही ९८.८० टक्के गुण मिळवून यश मिळवले आहे, तर तिसरा मुलगा निरंजन पंजाबराव बाविस्कर यानेही ९६.८० टक्के गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे. तिन्ही मुले येथील पंकज विद्यालयात एकाच वर्गात शिक्षण घेत होती.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक भागवत भारंबे, पंकज बोरोले माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील, बालवाडी विभागाच्या प्रमुख रेखा पाटील, पंकज ग्लोबलचे प्राचार्य मिलिंद पाटील आणि पंकज इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या नीता पाटील यांनी अभिनंदन केले आहे.