भुसावळ येथील द. शि. महाविद्यालय येथे सध्या लसीकरण केंद्र सुरू आहे. मात्र या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. त्यातच लस बऱ्याच वेळेस उपलब्ध होत नसल्याने नागरिक ताटकळत गर्दी करून उभे राहतात. एकाच ठिकाणी होत असलेल्या गर्दीमुळे शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे.
यासंदर्भात प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर, उल्हास पगारे, इम्तियाज शेख, सचिन पाटील, कैलास बोरसे आदींनी निवेदन दिले. लसीकरणाचे काम शहरामध्ये ठरावीक ठिकाणी सुरू आहे. त्यात फेरबदल करून लसीकरण केंद्र प्रत्येक वॉर्डात देऊन ठरावीक ठिकाणी होणारी गर्दी ही टाळता येईल जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल व नागरिकांच्या जीवाशी खेळ होणार नाही. प्रत्येक वॉर्डात आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यास आम्ही तयार आहोत. तरी प्रशासनाने वॉर्डात लसीकरण केंद्र लवकरात लवकर सुरू करावे, असे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे.
फोटो कॅप्शन :-
भुसावळ शहरातील प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांना प्रत्येक वॉर्डात लसीकरण सुरू व्हावे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक निवेदन देताना व चर्चा करताना.
फोटो ०६सीडीजे ४