जळगाव : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची आढावा बैठक रविवारी झाली. अध्यक्षस्थानी कास्ट्राईबचे विभागीय अध्यक्ष अनिल सुरडकर होते.
सहकार गटाच्या अध्यक्षपदी उदय पाटील यांची, तर गटनेतेपदी अजबसिंग पाटील यांची निवड झाल्याबद्दल बैठकीत त्यांचा सत्कार करण्यात आला. यासह कैलास तायडे, सेवानिवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी सुमित्र अहिरे, भुसावळ केंद्रप्रमुख भिकारी बोदडे, आरोग्य सेवक जे. बी. नन्नवरे, महासंघाचे जिल्हा उपाध्यक्षपदी एन. डी. सोनवणे, विनायक पगारे, विजय साबळे, जिल्हा संघटक राजेंद्र वानखेडे यांचाही सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील सोनवणे, शिक्षणविस्तार अधिकारी रविकिरण बिऱ्हाडे, राजेंद्र वानखेडे, रवींद्र पालवे, जितेंद्र जावळे, बी. ए. पानपाटील, रमेश सोनवणे, मिलिंद लोणारी, नितीन जाधव, अंबरनाथ सपकाळे, प्रमोद खैरे, सूर्यकांत घुले, किशोर म्हस्के, अविनाश बागुल, अनिल पगारे, पद्माकर बिऱ्हाडे, राहुल तायडे, महेंद्र वानखेडे, अशोक सैदाणे, संजय सपकाळे, डॉ. जितेंद्र साळुखे, किशोर नरवाडे, चंद्रकांत भालेराव, राजेंद्र केंदळे, मोहन टेमकर आदी उपस्थित होते.