रवींद्र मोराणकर जळगाव : लोकसभा निवडणुकांसाठी रावेर मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का फारच थोडा असल्याचे चित्र आहे. १२ उमेदवारांपैकी अर्ध्याहून अधिक उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही. तर चारच उमेदवार पदवीधारक व पदव्युत्तर आहेत. राजकारणातील उच्चशिक्षितांचा टक्का वाढावा, अशी अपेक्षा विविध पक्षांमधील नेते अनेकदा व्यक्त करताना दिसून येतात. राजकीय पक्षांकडून तर हव्या त्या संख्येत उच्चशिक्षित उभे नाहीच. मात्र लोकशाही मजबूत करण्यासाठी अपक्ष म्हणून उभे राहिलेल्यांमध्ये तर एकही पदवीधारक नाही, सर्व दहावी-बारावीच्या आतच आहेत.निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या शिक्षणाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. यातील २५ टक्के उमेदवार हे पदवीधर व पदव्युत्तर आहेत. एका उमेदवाराकडे डी.लीट. पदवी आहे. दोघा उमेदवारांनी शिक्षणाच्या कॉलमात निरंक म्हटले आहे. याचा अर्थ ते अशिक्षित आहेत.वैद्यकीय शाखेचे एकमेव उमेदवारएकूण डझनभर उमेदवारांमध्ये वैद्यकीय शाखेचे एकमेव उमेदवार आहेत. ते माजी खासदार तथा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.उल्हास पाटील आपले भवितव्य पुन्हा आजमावत आहेत. यानंतर विद्यमान खासदार रक्षा खडसे बी.एस्सी. (कॉम्प्यूटर) याही पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.उच्चशिक्षितांकडून पुढाकारच नाहीसमाजातील उच्चशिक्षित घटकांनी राजकारणात आले पाहिजे असा एक मोठा मतप्रवाह आहे. लोकशाहीत अपक्ष म्हणून आपले आव्हान उभे करण्यात पदवीधरांमध्ये उदासीनताच दिसून येत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण चार उमेदवार अपक्ष म्हणून आपले नशीब आजमावत आहेत. यातील एक उमेदवार दहावी पास, एक दहावी नापास, एक अशिक्षित आहे.शिक्षण पाहूनच मतदानभारताच्या सर्वाेच्च सभागृहात आपण आपला खासदार प्रतिनिधी म्हणून पाठवित असतो. त्याला किमान प्रश्न उपस्थित करता आले पाहिजे. यासाठी तो उच्च शिक्षित असावा. म्हणून उमेदवार निवडून देताना त्याचे शिक्षण बघून मी मतदान करतो. उमेदवाराच्या शिक्षणाला प्रथम प्राधान्य देतो.-अक्षय संजय पाटीलशिक्षित असावालोकसभा निवडणूक लढविणारा उच्चशिक्षित असावा ही अपेक्षा आहेच. कारण त्याच्या शिक्षणाचा व ज्ञानाचा उपयोग तो मतदारसंघाच्या विकासासाठी करू शकतो. याचबरोबर उमेदवार स्वच्छ चारित्र्याचा असावा व तो गुन्हेगारी पार्श्वभुमीचा नसावा. मतदारांच्या अडीअडचणींची जाण असणारा असावा.-डॉ.चंद्रशेखर पाटीलतरुणाईने विचार करावाउमेदवाराच्या शिक्षण पात्रतेसह त्याचे काम करण्याची क्षमता तपासूनच मतदान करणे जागरुक मतदाराचे कर्तव्य आहे. मात्र अलीकडे याबाबत दुर्लक्ष केले जाते. तरुणाईने याचा विचार करणे गरजेचे आहे. शिक्षणासह विकासाभिमुख दृष्टिकोन गरजेचा आहे, असे मला सूचवावेसे वाटते.-संजय सापधरे
सात उमेदवार अंडरग्रॅज्युएट; चार पदव्युत्तर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 1:18 PM