एरंडोल, जि.जळगाव : एरंडोल ते पिंपळकोठा गावादरम्यान झालेल्या कालीपिली व ट्रक अपघातात कालीपिली चालकासह सात प्रवासी ठार झाल्याचे वृत्त आहे. हा अपघात सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हॉटेल प्रियंकाजवळ झाला आहे. मयतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. सर्व मयत हे एरंडोल शहरासह तालुक्यातील उत्राण येथील रहिवासी आहेत.सूत्रांनुसार, एमएच-१९-वाय-५२०७ क्रमांकाची कालीपिली प्रवासी घेऊन एरंडोलकडे जात होती. तेव्हा एरंडोलहून जळगावकडे एमएच-१५-जी-८४७४ क्रमांकाची ट्रक जात होती. ट्रकने कालीपिलीला धडक दिली. त्यात सात जण झाल्याची माहिती मिळत आहे. यात चार जण जागीच झाले. पैकी तिघांची ओळख पटली आहे. ते तिघे एरंडोल शहरातील रहिवासी आहेत, उर्वरित उत्राण, ता.एरंडोल येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास एरंडोल ते उत्राण दरम्यान हा अपघात झाला. अपघातात कालीपिलीचा चक्काचूर झाला आहे. ट्रकचा एक्सल तुटल्याने हा अपघात झाल्याचे वृत्त आहे.
एरंडोलजवळ अपघातात सात जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 4:24 PM
एरंडोल ते पिंपळकोठा गावादरम्यान झालेल्या कालीपिली व ट्रक अपघातात कालीपिली चालकासह सात प्रवासी ठार झाल्याचे वृत्त आहे.
ठळक मुद्देकालीपिली व ट्रकचा झाला अपघातएरंडोल ते पिंपळकोठा दरम्यानची घटना