शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

भुसावळ तालुक्यात सात हजार लोकांनी अ‍ॅपवर नोंदवली मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:51 AM

भुसावळ तालुक्यात सुरू झालेल्या ग्राम स्वच्छता अभियानात सुमारे ७ हजार गावकऱ्यांनी आपली मते अ‍ॅपवर नोंदवली आहेत.

ठळक मुद्दे१ आॅगस्टपासून सर्वेक्षण सुरू झाले असून ३१ आॅगस्टपर्यंत ते चालणार आहे.जागृती मोहीम असून तिला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

भुसावळ जि. जळगाव : स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण २०१८ यामध्ये प्रशासनाने केलेल्या अथक परिश्रमाने शनिवारी पहिल्याच दिवशी तालुक्यात ६ हजार ९०५ लोकांनी आपली मते अ‍ॅपवर नोंदवली. ही मतनोंदणी १ आॅगस्ट पासून सुरू झाली असून ३१ आॅगस्ट पर्यंत चालणार आहे.'स्वच्छ ग्राम स्वच्छ जिल्हा' या योजनेंअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ हा उपक्रम केंद्र शासनाच्या माध्यमातून पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयातर्फे संपूर्ण देशभरात सुरू आहे. गेल्या १ आॅगस्टपासून हे सर्वेक्षण सुरू झाले असून ३१ आॅगस्टपर्यंत ते चालणार आहे.या सर्वेक्षणातून जिल्हा व राज्यांना रँक तथा क्रमवारी दिली जाणार आहे. त्यासाठी अँड्राईड मोबाईलमध्ये एसएसजी २०१८ हे अ‍ॅप डाऊनलोड करायचे असून त्यात विचारलेल्या ८ प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. अभियानाची माहिती, गावातील स्वच्छतेची सुधारणा, घनकचरा विल्हेवाट, ओल्या कचºयाची विल्हेवाट, वय, लिंग, शिक्षण व व्यवसाय अशा प्रश्नांची उत्तरे आपल्या गावासंदर्भात द्यायची असून त्यासाठी पर्याय दिलेले आहेत.तालुक्यात मोहीम सुरूया संदर्भातील अधिक जनजागृती मोहिमेस जि. प .चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार भुसावळ तालुक्यात प्रारंभ झाला आहे. तीन दिवशीय ही जागृती मोहीम असून तिला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, ग्रामीण वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी अशा कर्मचाºयांनी गावागावात जाऊन जनजागृती केली आणि अ‍ॅप डाऊनलोड करून मतनोंदणी करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, नियुक्त केलेल्या या कर्मचाºयांना तब्बल १२ तास तालुक्यातील गावात घरोघरी फिरावे लागले. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान