निंबा सोनारपिलखोड, ता.चाळीसगाव - उपखेड येथील सामाजिक महिला कार्यकर्त्या रुपाली रवींद्र मगर यांनी जागतिक महिला दिन निमित्त महिलांसाठी विशेष माहिती लोकमतला दिली आहे.गृहिणी म्हटले की सकाळपासून दुपार पर्यंत सर्वांची काळजी पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू राहतो. हवं नको ते बघणे, सर्व काम आनंदाने व प्रेमाने पार पाडणे. सर्व कामाचा तिचा पगार म्हणजे शून्य पैसे. तिचा पगार म्हणजे नवऱ्याने दोन वेळचे सोबतीने जेवण किंवा चहा घेणे किंवा गप्पा करणे, मुलांनी अभ्यासात चांगले गुण मिळविणे हाच तिचा पगार. ती पण एक व्यक्ती आहे, तिला पण भावभावना, सुख दु:ख, वेदना हर्ष असे काही तिच्या मनात चालू असते. स्त्रीला शक्तिशाली म्हणतात. तिच्यात सप्तश्रृंगी मातेसारख्या सात रसाळ गुणांची वर्णी असते. यात सहनशक्ती, प्रेरणा, गुरु,सावरणे, कनवाळू, प्रेमळ व संस्कार हे सप्तगुण स्त्रीयांमध्ये आहेत म्हणूनच तिला सर्वगुण संपन्न म्हटले जाते. प्रामाणिकपणा, सचोटी, जिद्द तिच्या अंगी असते.जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तिचा आदर करा, शक्य असल्यास तिच्या कामाची पावती तिच्या पदरात टाका. यात तिची कमाई म्हणजे काय तर कुटुंबाचे सुख व हास्य हेच होय. हे अमोघ हास्य त्रिकाल टिकून ठेवा हाच महिला दिनी संदेश.
सात रसाळ गुणांची धनी म्हणजे स्त्री - रुपाली मगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 12:51 AM