मंगळवारी पहाटेपासून चाळीसगाव परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने अनेक घरात पाणी शिरले. तेथे प्रशासकीय अधिकारी पोहचून मदत कार्य सुरू केले. या भागात मदत म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सेवाभावी संस्थांना मदतीचे आवाहन केले. त्यानुसार सेेवारथ परिवारमार्फत तातडीची मदत पाठविण्यात आली.
१२५ साड्या, १०० चटई, २७० फरसाणचे पाकीट, १२० बिस्किट पाकिटे, पाण्याच्या बाटल्याचे २०० खोके तसेच सोबत दोन रुग्णवाहिकांसह मदतीसाठी १२ कार्यकर्ते रवाना झाला. अजून काही मदत लागल्यास देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सेवारथ संस्थेमार्फत दिलीप गांधी, डॉ. रितेश पाटील, डॉ. नीलिमा सेठिया यांनी सांगितले. यासाठी चटई असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र रायसोनी, राजू अडवाणी, विजय रेवतानी, कवी कासार यांनी मदत केली.