जळगाव- बालनिरिक्षण गृहातील जीवन, बालविवाह, बाजमजुरी तसेच चांगला व वाईट स्पर्श यासह विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी लघु बालनाटीकांमधून प्रकाश टाकत सामाजिक संदेश दिला़ बुधवारी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात पार पडलेल्या या लघु बालनाट्य स्पर्धेत निकालअंती शानभाग विद्यालयाने बाजी मारत बक्षीस पटकाविले़बालहक्क दिनानिमित्त बुधवारी केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्प व जिल्हा महिला व बालविकास समितीच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८़१५ वाजेच्या सुमारास सागर पार्क येथून विद्यार्थ्यांच्या रॅलीला सुरूवात झाली़ सुमारे २२ शाळांमधील ७०० बालकांचा रॅलीमध्ये समावेश होता़ त्यांच्या हातात बालव्यथा, समस्या व त्यावरील उपाय सूचक फलक होते़ या रॅलीला डॉ़ राजेश डाबी, विजयसिंग परदेशी, दिलीप चोपडा, डॉ़ शैलजा चव्हाण, अनिता कांकरिया यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ झाली़ त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध घोषणा दिल्या़ त्यानंतर रॅलीचा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे समारोप झाला़वाढीव अपेक्षेच दडपणदरम्यान, सकाळी १० वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात आयोजित लघु बालनाटीका स्पर्धेच्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सवक डॉ़एऩएस़चव्हाण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, वैजयंती तळेले, प्रदीप पाटील, डॉ़ शैलजा चव्हाण, दिलीप चोपडा आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती़ चोपडा यांनी प्रास्ताविका सर्वेक्षणाची माहिती दिली़ त्यात त्यांनी ६० टक्के बालकांवर पालकांच्या वाढीव अपेक्षेचे दडपण व पालकांसोबतचे हरवलेले संवाद आढळून आले़ तसेच डॉ. एन.एस. चव्हाण यांनी मनोगतात बेटी बचाओ अभियानात केलेल्या कार्याची माहिती देत मार्गदर्शन केले़सामाजिक प्रश्नांवर टाकला प्रकाशबालनाट्य स्पर्धेच्या सुरूवातीला अॅड. महिमा मिश्रा यांच्या ६ सहकाऱ्यांनी तारे जमीपर या गीतावर नृत्य सादर केले़ उत्कृष्ट सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांकडून टाळ्यांचा गजर झाला़ त्यानंतर लघुनाटीकेला सुरूवात झाली़ ९ शाळांमधील विद्यार्थ्यांनी लघू नाटीका सादर केली़ त्यामध्ये बाल विवाह, बालमजुरी, लेगिक शोषण, वाईट व बरा स्पर्श आदी विषयांचा समावेश होता़ त्यानंतर परीक्षक अमोल ठाकूर व दीपक भट यांनी निकाल जाहीर केला़ प्रथम क्रमांक शानभाग विद्यालयातने तर द्वितीय क्रमांक विवेकानंद प्रतिष्ठान इग्लिश स्कूल,वाघनगर यांनी तर तृतीय क्रमांक दांडेकर नगरातील स्वामी समर्थ माध्य.विद्यालयाने पटकाविला़ तसेच उतेजनार्थ दादावाडी येथील बालविश्व इग्लिश मिडीयम स्कूल यांना पटकाविला़ स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देवून सत्कार करण्यात आला़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी भट यांनी तर आभार डॉ़ शैलजा चव्हाण यांनी मानले़ मंजुषा पवनीकर यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी समतोल व्यास्थापिका सपना श्रीवास्तव व कार्यकर्ते सोबत चाईल्ड हेल्पलाईनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.