बीएचआरचे सॉफ्टवेअर व टेंडर प्रक्रिया सूरज झंवरला कार्यालयात दिसण्याकरीता कुणाल शहा याने झंवरच्या कार्यालयात इन्स्टॉल केले होते व दोन्ही कार्यालये ऑनलाईन लिंक केले होते. त्यामुळे शहा याच्याकडून सूरजला टेंडरचे कोड आधीच समजत होते, त्यानंतर झंवर हा सर्वात जास्त रकमेचे टेंडर भरत होता. झंवर व शहा यांच्यात झवरच्या कार्यालयात बैठका व्हायच्या व तेथे कर्ज प्रकरणात तडजोड केली जात असल्याचेही तपासात पुढे आले आहे.
साई मार्केटींगच्या खात्यातून निविदा धारकांच्या खात्यात पैसे वर्ग
साई मार्केटींग ॲण्ड ट्रेडींग कंपनी यांच्या खात्यावरुन निविदाधारकांचे बँक खात्यावर पैसे वर्ग करण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झालेले आहे. निविदा भरणारे लोक झंवर याच्या कार्यालयाशी संबंधित होते किंवा बाहेरचे त्यात पारदर्शकता असल्याचे भासविले जात आहे. पतसंस्थेच्या अपहाराच्या रकमेतून झंवर याने स्थावर व जंगम मालमत्ता खरेदी केल्याचा संशय पोलिसांना आहे.
१२ टक्के व्याजाने हिशेब
तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, महावीर जैन हा सुनील झंवर याच्या कार्यालयात येत होता व बीएचआरच्या कर्ज खात्याचे उतारे कुणाल शहाने इन्स्टॉल करुन दिलेल्या सॉफ्टवेअरमधून घेऊन ही कर्जखाती सरळव्याजाने व १२ टक्के व्याजाने हिशेब करुन देत होता.
दरम्यान, या गुन्ह्यात प्रकाश जगन्नाथ वाणी (ठाणे) व अनिल रमेशचंद्र पगारिया (रा.शिवराम नगर) या दोघांना ३ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे.