शहरं
Join us  
Trending Stories
1
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
2
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
3
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
4
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
5
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
6
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
7
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
8
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
9
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
10
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
11
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
12
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
13
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
14
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
15
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
16
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
17
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
18
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
19
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
20
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना

शहीद भगतसिंह समग्र वाङ्‌मय शासनाने प्रकाशित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2020 4:12 PM

शहीद भगतसिंह हे तरुणांचे आदर्श असून त्यांचे समग्र वाङ्‌मय महाराष्ट्र शासनाने प्रकाशित करावे, अशी मागणी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेने केली आहे.

ठळक मुद्देचाळीसगावी मागणीवीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेने दिले निवेदन

चाळीसगाव : शहीद भगतसिंह हे तरुणांचे आदर्श असून त्यांचे समग्र वाङ्‌मय महाराष्ट्र शासनाने प्रकाशित करावे, अशी मागणी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेने केली आहे. मंगळवारी परिषदेने या मागणीचे निवेदन तहसीलदार अमोल मोरे यांना दिले.जून २००६ मध्ये शहीद भगतसिंह समग्र वाङ्‌मयासंदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलले गेले. निवृत्त न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांच्या अध्यक्षतेखाली शहिद भगतसिंह जनशताब्दी समिती स्थापन करण्यात आली. त्यात डॉ. नरेंद्र दाभोळकर,प्रा. डॉ. एन. डी. पाटील,अ‍ॅड. गोविंद पानसरे,डॉ.रावसाहेब कसबे,भाई वैद्य,प्रा. पुष्पा भावे,डॉ. भास्कर ल. भोळे, रा. प. नेने,आचार्य शांताराम गरुड,डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, असगरअली इंजिनिअर,डॉ. अशोक ढवळे, ज्योती म्हापसेकर,डॉ. रत्नाकर महाजन,आ. उल्हास पवार, अ‍ॅड. जयदेव गायकवाड हे मान्यवर सदस्य म्हणून होते. या समितीच्या माध्यमातून शहिद भगतसिंह समग्र वाङ्‌मय दत्ता देसाई यांच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आले. त्यात भगतसिंह यांच्या ८० दस्तऐवजांचा समावेश आहे. भगतसिंह यांची पत्रे, त्यांची तुरुंग डायरी, त्यांनी लिहिलेली पुस्तके अशी बरीच माहिती त्या ग्रंथात आहे. न्या.पी.बी.सावंत यांची दिर्घ प्रस्तावना या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. हे पुस्तक खाजगी प्रकाशन संस्थेमार्फत प्रकाशित केले जात आहे. त्यामुळे हे प्रेरणादायी वाङ्‌मय शासनाने प्रकाशित केल्यास त्याची किंमत कमी होऊन सर्वसामान्यांना ते सहज उपलब्ध होईल. शासनाने मागणीचा विचार करावा. असेही निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर राज्य प्रवक्ते पंकज रणदिवे,तालुकाध्यक्ष पंकज पाटील,जिल्हा सचिव भूषण सूर्यवंशी, तुषार देसले, दीपक पाटील, राहुल राजपूत, नीलेश गायकवाड, विनोद शिंपी, पवन निकुंभ, पंकज पवार यांच्या सह्या आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणChalisgaonचाळीसगाव