शहाजहाने मुमताज साठी ताजमहाल बांधला, तुम्ही स्वत:साठी शौचालय बांधा : अजितदादा पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 05:45 PM2017-12-28T17:45:36+5:302017-12-28T17:52:01+5:30

चोपडा येथे ओमशांती नागरी पतसंस्थेच्या वास्तूचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

Shahjahan built Taj Mahal for Mumtaz, build a toilet for yourself: Ajit Pawar | शहाजहाने मुमताज साठी ताजमहाल बांधला, तुम्ही स्वत:साठी शौचालय बांधा : अजितदादा पवार

शहाजहाने मुमताज साठी ताजमहाल बांधला, तुम्ही स्वत:साठी शौचालय बांधा : अजितदादा पवार

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्याने सहा आमदार दिले तेव्हा उपमुख्यमंत्री झालो. जास्तीचे आमदार दिल्यास राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईलनोटबंदीमुळे राज्यातील सहकार क्षेत्र कोलमडलेमुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार केवळ भाषणात वस्ताद

आॅनलाईन लोकमत
चोपडा : शहाजहाने मुमताजसाठी ताजमहाल बांधला होता तुम्ही मात्र स्वत: साठी शौचालय बांधावे असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी चोपडा येथे ओमशांती नागरी पतसंस्थेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन सोळ्याप्रसंगी केले.
अजित पवार बोलतांना म्हणाले की, जिल्ह्याने सहा आमदार दिले, तेव्हा मी उपमुुुुख्यमंत्री झालो होतो. आगामी काळात जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार दिल्यास राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कोणत्याही सहकारी संस्थांमध्ये बारकाईने लक्ष दिले तरच फायद्यात येतात. संस्था चालविणाºयांनी आपण विश्वस्त आहोत मालक नाही याची जाणीव ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
आताच्या सरकारचा सहकाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. शेतकरी सावकाराच्या दारात जावू नये म्हणून खºया अर्थाने सहकार क्षेत्र विकसित करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला गेला. नोटबंदीमुळे जनतेला खूप त्रास झाला. नोटबंदीत काळा पैसा बाहेर येण्याऐवजी तो पांढरा झाला. राज्यातील व देशातील सहकार क्षेत्रातील बॅकांना नोटबंदींचा मोठा त्रास झाला.
मुख्यमंत्री भाषणात वस्ताद आहेत. आजचे सरकार सहकाराशी दुजाभावाने वागत आहे. मात्र खाजगी बॅकांना प्रोत्साहन देत आहेत. उद्योगपतीची २ लाख ११ हजार कोटी रुपये कर्ज माफ केले. तोच न्याय शेतकºयांना का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, पारोळ्याचे आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, चंद्रहास गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार जगदीश वळवी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन मृणाल गुजराथी आणि संजय बारी यांनी तर प्रशांत भावसार यांनी आभार व्यक्त केले.

Web Title: Shahjahan built Taj Mahal for Mumtaz, build a toilet for yourself: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.