शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

शहाजहाने मुमताज साठी ताजमहाल बांधला, तुम्ही स्वत:साठी शौचालय बांधा : अजितदादा पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 5:45 PM

चोपडा येथे ओमशांती नागरी पतसंस्थेच्या वास्तूचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

ठळक मुद्देजिल्ह्याने सहा आमदार दिले तेव्हा उपमुख्यमंत्री झालो. जास्तीचे आमदार दिल्यास राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईलनोटबंदीमुळे राज्यातील सहकार क्षेत्र कोलमडलेमुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार केवळ भाषणात वस्ताद

आॅनलाईन लोकमतचोपडा : शहाजहाने मुमताजसाठी ताजमहाल बांधला होता तुम्ही मात्र स्वत: साठी शौचालय बांधावे असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी चोपडा येथे ओमशांती नागरी पतसंस्थेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन सोळ्याप्रसंगी केले.अजित पवार बोलतांना म्हणाले की, जिल्ह्याने सहा आमदार दिले, तेव्हा मी उपमुुुुख्यमंत्री झालो होतो. आगामी काळात जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार दिल्यास राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कोणत्याही सहकारी संस्थांमध्ये बारकाईने लक्ष दिले तरच फायद्यात येतात. संस्था चालविणाºयांनी आपण विश्वस्त आहोत मालक नाही याची जाणीव ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.आताच्या सरकारचा सहकाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. शेतकरी सावकाराच्या दारात जावू नये म्हणून खºया अर्थाने सहकार क्षेत्र विकसित करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला गेला. नोटबंदीमुळे जनतेला खूप त्रास झाला. नोटबंदीत काळा पैसा बाहेर येण्याऐवजी तो पांढरा झाला. राज्यातील व देशातील सहकार क्षेत्रातील बॅकांना नोटबंदींचा मोठा त्रास झाला.मुख्यमंत्री भाषणात वस्ताद आहेत. आजचे सरकार सहकाराशी दुजाभावाने वागत आहे. मात्र खाजगी बॅकांना प्रोत्साहन देत आहेत. उद्योगपतीची २ लाख ११ हजार कोटी रुपये कर्ज माफ केले. तोच न्याय शेतकºयांना का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, पारोळ्याचे आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, चंद्रहास गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार जगदीश वळवी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन मृणाल गुजराथी आणि संजय बारी यांनी तर प्रशांत भावसार यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारJalgaonजळगावChopdaचोपडा