लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : फीसाठी निकाल राखून ठेवल्याच्या प्रकरणात चौकशीअंती अखेर कै. श्रीमती ब. गो. शानबाग विद्यालय दोषी असल्याचा अहवाल गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी शिक्षणाधिकारी यांना दिला आहे. शाळेला सक्त ताकीद द्यावी, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांच्या तक्रारीनंतर शिक्षक व उपमुख्याध्यापकांच्या लेखी जबाबानुसार चौकशीअंति हा अहवाल सादर करण्यात आला आहे. यानंतर आता निकाल रोखून धरल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
कोट
विद्यालय प्रशासनाने खुलाशात सामाजिक जाणीवतेचा उल्लेख केला आहे; मात्र गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अहवालांमुळे विद्यालय प्रशासन तोंडघसी पडले आहे. अशा संस्था निकाल राखीव ठेवत असतील तर इतरांनी काय करावे.
- रवींद्र शिंदे, तक्रारदार
तक्रारी येतात समोर
शानबाग विद्यालयाच्या या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर हळूहळू आता विविध शाळांबाबतच्या तक्रारी समोर येत आहेत. फीसाठी निकाल राखून ठेवला जात असून, विनंती केल्यानंतर तो आठवडाभराने दिला जात असल्याच्या या तक्रारी आहेत.