आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.५ : दरवर्षी उन्हाळ्यातील उकाड्यामुळे जळगावकर नेहमीच हैराण असतात. १९८५-८६ साली जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित एका कार्यक्रमानिमित्त अभिनेते शशी कपूर जळगावात आले असताना त्यांनाही जळगावच्या उकाड्याने हैराण करून सोडले होते. त्यांनी त्यांच्या भाषणात देखील जळगावचा उकाडा खूप असह्य असल्याचे सांगितले होते, अशा अनेक आठवणींना ‘आकाशवाणी’च्या सेवानिवृत्त ज्येष्ठ उद्घोषिका डॉ.उषा शर्मा यांनी ‘लोकमत’ शी बोलताना उजाळा दिला.हिंदी चित्रपट सृष्टीत सदाबहार अभिनेते अशी ओळख असलेले शशी कपूर यांचे सोमवारी निधन झाले. त्यांनी जळगावला भेट दिली होती. १९८५-८६ च्या काळात जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस कल्याण निधी विभागातर्फे पोलीस कवायत मैदान नजिकच्या मैैदानावर (सध्याचा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शशी कपूर यांच्यासोबत संगीतकार मन्ना डे यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाविषयी माहिती देताना डॉ.उषा शर्मा यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या भाषणात जळगाव खूप भावले असल्याचे सांगितले. मात्र जळगावात खूप उकाडा असल्याने हैराण झाले होते, अशी माहिती डॉ.शर्मा यांनी दिली. शशी कपूर यांच्या चित्रपटाच्या काही आठवणीही त्यांनी सांगितल्या. शशी कपूर यांनी १९५१ साली आवारा चित्रपटात बाल कलाकाराची भूमिका केली होती़ या चित्रपटात राजकपूर यांच्या धाकट्या भावाचे पात्र त्यांनी साकारले होते़ धर्मपूत्र या चित्रपटातून त्यांनी अभिनेता म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती़जळगावचा चिवडा आवडला...डॉ. उषा शर्मा यांनी शशी कपूर यांची मुलाखत घेतली होती. यावेळी डॉ.उषा शर्मा यांच्यासोबत भगवान भटकर व आकाशवाणी जळगाव केंद्राचे काही सहकार देखील उपस्थित होते. यावेळी त्यांना जळगावचा चिवडा देखील खूप आवडला असल्याची माहिती डॉ. शर्मा यांनी दिली.
जळगावातील असह्य उकाड्याने शशी कपूर झाले होते हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 2:08 PM
डॉ.उषा शर्मा यांनी दिला शशी कपूर यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस दलातर्फे कार्यक्रमाचे आयोजनशशी कपूर यांच्यासोबत संगीतकार मन्ना डे यांची उपस्थितीशशी कपूर यांना आवडला होता जळगावचा चिवडा